Sangli : पलूस-कडेगाव आमसभा 10 तास रंगली; ग्रामप्रश्नांवर ठोस चर्चा !
दोन्ही तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी : उर्वरित कामे लवकरच निकाली : आ. विश्वजीत कदम
कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमसभेचे कामकाज तब्बल १० तासापेक्षा जास्त वेळ चालले. यामध्ये दोन्ही तालुक्यातील गावातील अनेक प्रश्रांची सोडवणूक करण्यात आली. काही प्रश्र येत्या काही दिवसांत निकाली काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पलूस-कडेगावच्या आमसभेचे कामकाज सकाळी १० वा. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाले. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आपापल्या गावाचे प्रश्र उपस्थित करत प्रश्रांची सरबत्ती केली.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासमोर संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची सोडवणूक केली. इतर प्रश्र येत्या काळात सोडवून अहवाल सादर करण्याचे आश्वस्त केले.
यावेळी प्रामुख्याने आरोग्य, जलसंपदा (ताकारी टेंभ) महावितरण, रस्ते, सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, कृषी, एस.टी, कडेगाव नगरपंचायत, पलूस नगरपरिषद, क्रीडा, मार्केट कमिटी, महसूल विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदसंबंधी विविध प्रश्रांवर चर्चा झाली.
नागरिकांच्या अनेक वर्षाच्या प्रश्रांना जागेवर वाचा फुटल्याने या आमसभेबाबत दोन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यावेळी पलूस तालुक्यातील नागरिकांनी पर्जन्यमापक हा चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने पलूस तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले, तसेच क्षारपड जमिनीबाबत शासन स्तरावर प्रयत्न करून त्यावर मार्ग काढण्याचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आश्वस्त केले. त्याचबरोबर जलजीवन मिशनची रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची बिले शासन स्तरावर भरण्याची मागणी यावेळी काही ग्रामस्थांनी केली.
कडेगाव तालुक्यातील टेंभू ताकारी योजना तसेच अनेक ठिकाणी प्रलंबित रस्ते व महावितरणच्या प्रश्रांवर नागरिकांनी प्रश्रांची सरबत्ती केली. कडेगाव शहरात महिन्यातून चार वेळा आर. टी.ओ. कॅम्पची मागणी केली. सोनहीरा कारखाना ज्यापद्धतीने ऊस बिलातन पाणीपट्टी कपात करतो त्याचप्रमाणे इतर कारखान्यांनी सुद्धा करावी अन्यथा सोनहिरादेखील ती रक्कम शेतकऱ्यांना परत करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, आज प्रथम आपण आमसभा घेतली असून त्याबाबतच्या त्रुटी लक्षात आल्या असून येणाऱ्या काळात वर्षातून किमान तीन वेळा अश्या आमसभा होणार आहेत, कडेगाव व पलूस तालुक्याच्या स्वतंत्र आमसभा होतील. गाववार बैठका घेणार असल्याचे ते म्हणाले, आज जे प्रश्न उपस्थित झाले ते अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेऊन त्याची सोडवणूक करावी. त्याचा अहवाल आपण स्वतः घेणार आहे, काही अधिकारी बिघडलेत, असू दे मी त्यांच्याकडे माझ्या पध्दतीने बघतो असा सज्जड दम त्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला. महावितरणने परस्पर स्मार्ट मीटर बसवू नये, तसे केल्यास ते मीटर फोडले जातील असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी खासदार विशाल पाटील, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, कडेपूर सरपंच सतीश देशमुख, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार डॉ. विश्वजीत कदम दहा तास एका जागेवर...
पलूस-कडेगावची आमसभा तब्बल १० तास चालली असून या १० तासांत आमवार डॉ. विश्वजीत कवम एक मिनिट सुद्धा आपल्या जागेवरून हलले नाहीत. प्रत्येक गावातील प्रश्न समजून घेत, त्यावर मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्याऱ्यांना सूचित करत होते, एका जागेवर तब्बल १० तास बसून असलेल्या आमवार डॉ. कवम यांची सभास्थळी चर्चा होत होती.
कडेगावला एस.टी. डेपो व रेल्वेची जोरदार मागणी...
कडेगाव शहरात एस.टी. डेपो व्हावा, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी रेल्वे मार्गाची चर्चा असून त्याबाबत काही सर्व्हे वेखील झाले असून त्याबाबत वेखील पाठपुरावा करून याठिकाणी एस.टी. डेपो व रेल्वे यावी अशी जोरवार मागणी यावेळी करण्यात आली.