कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पालेकर अकादमी, युनियन जिमखाना विजयी

10:52 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजीवनी चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित संजीवनी चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांत जिमखाना संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 8 गड्यांनी तर प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने आनंद अकादमीचा 75 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मोहित कुंभार व संचिता नाईक यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 21.5 षटकात सर्वगडी बाद 82 धावा केल्या. त्यात तरुण मितीने 18 धावा केल्या. जिमखानातर्फे संचिता नाईकने 11 धावात 5 गडी बाद केले. अजम पाटीलने 9 धावात 2 तर प्रणवने 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 12.3 षटकात 2 गडी बाद 83 धावा करून सामना 8 गड्यानी जिंकला. त्यात सारुष अगसगेकरने 1 षटकार 6 चौकारासह 42, समर्थ कोलेकरने 2 चौकारासह 10 धावा केल्या. बीएससीतर्फे समर्थ व जुहान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात प्रमोद पालेकर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 186 धावा केल्या. मोहित कुंभारने 7 चौकारासह 53, प्रथम अलबालने 5 चौकारासह 36, अनुप कुंडेकरने 4 चौकारासह 32, हर्षिदने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे प्रणव कांबळे व फहाद अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article