For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पाकचा मुख्य प्रशिक्षकासाठीचा शोध अखेर ल्यूक राँचीवर केंद्रीत

06:45 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकचा मुख्य प्रशिक्षकासाठीचा शोध अखेर ल्यूक राँचीवर केंद्रीत

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा नवीन मुख्य प्रशिक्षकासाठीचा शोध सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज ल्यूक राँचीवर केंद्रीत झाला आहे. पीसीबीच्या एका सूत्राने बुधवारी सांगितले की, 42 वर्षीय रोंचीसोबत विस्तृत चर्चा झाली आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमधील संघ इस्लामाबाद युनायटेडचा प्रशिक्षक देखील आहे.

कोणत्याही प्रसिद्ध प्रशिक्षकाने पीसीबीबरोबर काम करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. कारण त्यापैकी बहुतेक आधीच वेगवेगळ्या लीगसाठी बांधिल झालेले आहेत किंवा पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करण्याबाबत त्यांना शंका आहेत. त्यामुळे शोध राँचीवर येऊन थांबला आहे, असे सूत्रांनी सांगितले. न्यूझीलंडविऊद्धची मायदेशातील टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी येत्या काही दिवसांत राँचीसोबतचा करार निश्चित व्हायला हवा, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement

राँचीने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर न्यूझीलंड संघाचा फलंदाज सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, पीसीबीने काही प्रसिद्ध प्रशिक्षकांशी संपर्क साधला होता. परंतु त्यापैकी बहुतेक एक तर आधीच बांधिल झालेले आहेत किंवा पाकिस्तान मंडळाची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास नाखूष आहेत. पीसीबीच्या परदेशी आणि देशी प्रशिक्षकांकडील वर्तनाचा इतिहास पाहता काही परदेशी प्रशिक्षकांच्या शंका समजण्यासारख्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

रोंचीनेही अद्याप होकार दिलेला नाही आणि निकाल कसेही आले, तरी पाकिस्तान संघासोबत काम करण्यासाठी निश्चित कालावधी आपल्याला मिळेल असे ठोस आश्वासन त्याने मागितलेले आहे. ‘त्याला स्पष्ट आश्वासन हवे आहे की, त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन ठरावीक कालावधीनंतरच केले जाईल, प्रत्येक मालिका किंवा स्पर्धेनंतर नव्हे, असे सूत्रांनी सागितले.

Advertisement
Tags :
×

.