दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर
► वृत्तसंस्था / इस्लामाबाद
डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने जाहीर केलेल्या 18 सदस्यीय कसोटी संघात त्याला स्थान मिळाले आहे.
शान मसूद पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहीमेला सुरूवात करताना संघाचे नेतृत्व करेल. वर्षाच्या सुरूवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाकिस्तानच्या सर्वात अलिकडील कसोटी मालिकेत तो खेळू शकला नव्हता. वेगवान गोलंदाज नसीम शाहला स्थान मिळाले नाही तर अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा समावेश करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबरपासून लाहोरमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी संघात कपात करण्यात येणार आहे. आसिफ आफ्रिदी, फैसल अक्रम आणि रोहेल नझीर यांना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळेल. कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या व्हाईटबॉल मालिकेसाठी पाकिस्तान योग्यवेळी आपला संघ जाहीर करेल.
पाकिस्तान संघ : शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम उल हक, कामरान गुलाम, खुर्रम शहाजाद, मोहम्मद रिझवान, नोमान अली, रोहेल नझीर, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी
मालिकेची वेळापत्रक
पहिली कसोटी : गद्दाफी स्टेडियम लाहोर 12 ते 16 ऑक्टोबर
दुसरी कसोटी : रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी 20 ते 24 ऑक्टोबर.