For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिक्स बँकेच्या सदस्यत्वासाठी पाकिस्तानची धडपड

06:22 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
ब्रिक्स बँकेच्या सदस्यत्वासाठी पाकिस्तानची धडपड
Advertisement

चीनकडे मागितली मदत

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

आर्थिक आघाडीवर कोलमडून गेलेला पाकिस्तान आता स्वत:च्या स्थितीचा दाखला देत जगभरात आर्थिक मदतीसाठी हात पसरत आहे. आता पाकिस्तानने ब्रिक्स देशांची बँक न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (एनडीबी) सदस्यत्वासाठी चीनकडे याचना केली आहे. याच्या बदल्यात पाकिस्तानने चीनला ऑफरही दिली आहे. चीनच्या कंपन्या, उद्योग आणि खनिजांच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अधिक संधी उपलब्ध करविणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी वॉशिंग्टनमध्ये चीनचे अर्थमंत्री लियाओ मिन यांची भेट घेतली आहे. यादरम्यान त्यांनी एनडीबीच्या सदस्यावरून चर्चा केली आहे. एनडीबीचे सदस्यत्व मिळवून देण्यास चीनने मदत करावी. याच्या बदल्यात पाकिस्तानात कृषी, उद्योग आणि खनिजक्षेत्रात चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार असल्याचे औरंगजेब यांनी सांगितले आहे.

ब्रिक्स देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने मिळून एनडीबी स्थापन केली आहे. या बँकेचा उद्देश पायाभूत सुविधा, निरंतर पोषणीय विकासाशी निगडित प्रकल्पांकरता निधी उपलब्ध करविणे आहे. विकसनशील देशांच्या विकासात ही बँक मोठी भूमिका बजावत आहे. चालू वर्षी फेब्रुवारीत पाकिस्तानच्या इकोनॉमिक कोऑर्डिनेशन कमिटीने एनडीबीत 582 दशलक्ष डॉलर्सच्या समभाग खरेदीला मंजुरी दिली आहे. ईसीसीने पाकिस्तानच्या एनडीबी सदस्यत्वाला मंजुरी दिली आहे.

पाकिस्तानने नोव्हेंबर 2024 मध्ये ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. चीनने पाकिस्तानला या सदस्यत्वासाठी भरवसा देखील दिला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चीनच्या अध्यक्षांच्या भेटीनंतर पाकिस्तानच्या अपेक्षांना सुरुंग लागला होता. तुर्कियेला भागीदार देश म्हणून सामील करण्यात आले होते, परंतु पाकिस्तानचा विचार करण्यात आला नाही.

ब्रिक्समध्ये अधिक देशांचे स्वागत करण्यास तयार आहोत, परंतु निर्णय सर्वसंमतीने घेतले जावेत अशी भूमिका भारताने मांडली होती. कुठल्याही देशाला सदस्यत्व देण्यापूर्वी ब्रिक्सच्या संस्थापक देशांचे मत विचारात घेतले जावे अशी टिप्पणी पंतप्रधान मोदींनी केली होती. ब्रिक्सच्या संस्थापक देशांमध्ये रशिया, चीन, भारत आणि ब्राझीलचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.