For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तस्करीचा ना‘पाक’ प्रयत्न उधळला

06:19 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तस्करीचा ना‘पाक’ प्रयत्न उधळला
Advertisement

राजस्थान सीमेवर 60 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर/अनुपगड

राजस्थानमध्ये सीमापार तस्करी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने, सुरक्षा दलांनी शनिवारी राजस्थानच्या अनुपगड जिह्यात ड्रोनद्वारे पाकिस्तानातून तस्करी करत असलेले 12 किलो हेरॉईन जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत साधारणपणे 60 कोटी रु पये आहे.

Advertisement

राजस्थानमधील श्रीगंगानगरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करी सातत्याने वाढत आहे. शनिवारी येथे दोन प्रकरणे नोंदवली गेली. जिह्यातील अनुपगडला लागून असलेल्या 13के कैलास पोस्ट येथे शनिवारी पहाटे साडेचार वाजता अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून ड्रोनमधून येणारे हेरॉईन ताब्यात घेतले. यादरम्यान सुमारे 25 राउंड फायर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पोलिसांनी जिह्यातील अनुपगढ आणि समेजा कोठी पोलीस स्टेशन परिसरातून प्रत्येकी सहा किलो वजनाच्या हेरॉईनच्या दोन खेप जप्त केल्या आहेत. या अमली पदार्थांची ड्रोनद्वारे पाकिस्तानातून तस्करी केली जात होती. ड्रोनचा आवाज ऐकून बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. संयुक्त झडतीदरम्यान बीएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सहा किलो वजनाची हेरॉईनची दोन पाकिटे सापडली.

Advertisement
Tags :

.