महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानचे ‘नापाक’ कारस्थान

06:58 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 भारतात घुसखोरीचा कट : लष्कर-बीएसएफ सतर्क : पाकिस्तानचे आणखी एक कृत्य उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सोडताना दिसत नाही. पुन्हा एकदा सीमेपलीकडून दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर बीएसएफने अलर्ट जारी केला आहे. सुमारे 250 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा विचार करत आहेत. सीमेपलीकडील लाँचपॅडवर हे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवर सुमारे 250 ते 300 दहशतवादी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा विचार करत आहेत. या घुसखोरीच्या कटामुळे सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू, असे बीएसएफचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर बीएसएफ आणि लष्कराने सर्व संवेदनशील भागांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. बीएसएफ आणि लष्कराचे शूर जवान सीमाभागात सतर्क असून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लॉन्च पॅडवर 250-300 दहशतवादी घुसखोरीच्या प्रतिक्षेत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली आहे, परंतु बीएसएफ आणि लष्कर सर्व संवेदनशील ठिकाणांवर बारीक नजर ठेवून आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असल्याचे बीएसएफ महानिरीक्षक अशोक यादव यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दल आणि काश्मीरमधील जनता यांच्यातील बंध वाढला आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य केले तर आम्ही विकासाची कामे चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article