महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानचा 448 धावांचा डोंगर

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सौद शकिल, मोहम्मद रिझवान यांची दमदार शतके

Advertisement

वृत्तसंस्था/रावळपिंडी

Advertisement

सौद शकिल आणि मोहम्मद रिझवान यांच्या दमदार शतकांच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान पाकने आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर बांगलादेशने दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद 27 धावा जमविल्या. पाकने 4 बाद 158 या धाव संख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. सौद शकिल आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाचव्या गड्यासाठी 240 धावांची भागिदारी केली. सौद शकीलने 261 चेंडूत 9 चौकारांसह 141 तर मोहम्मद रिझवानने 239 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 171 धावा झळविकल्या. पाकच्या डावामध्ये सलामीच्या सईम आयुबने 98 चेंडूत 56, तर शाहीन आफ्रिदीने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 29 धावा जमविल्या. बांगलादेशने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना खेळाच्या शेवटच्या सत्रात 12 षटकात बिनबाद 27 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव: 113 षटकात 6 बाद 448 -डाव घोषित (सौद शकिल 141, मोहम्मद रिझवान नाबाद 171, सईम आयुब 56, अब्दुला शफीक 2, शान मसुद 6, बाबर आझम 0, आगा सलमान 19, शाहीन आफ्रिदी नाबाद 29, अवांतर 24, एस.एस्लाम 2-77, हसन मेहम्मुद 2-70, मेहदी हसन मिराज 1-80, शकीब अल हसन 1-100), बांगलादेश प. डाव 12 षटकात बिनबाद 27 (शदमान इस्लाम खेळत आहे 12, झाकीर हसन खेळत आहे 11, अवांतर 4)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article