महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकचा कॅनडावर विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय

06:58 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅनडाचा 7 गड्यांनी पराभव, रिझवानचे नाबाद अर्धशतक, मोहम्मद आमीर ‘सामनावीर’, जॉन्सनचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

2024 सालातील आयसीसीच्या येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अ गटातील सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने कॅनडाचा 15 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव करत आपला पहिला विजय नेंदविला. 13 धावात 2 गडी बाद करणाऱ्या मोहम्मद आमिरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. कॅनडाच्या जॉन्सनचे अर्धशतक वाया गेले. या विजयामुळे पाकचे स्पर्धेतील आव्हान अद्याप जिवंत राहिले आहे. त्यांचा अ गटातील शेवटचा सामना आयर्लंडबरोबर 16 जूनला फ्लोरिडा येथे होणार आहे.

पाकने नाणेफेक जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजी दिली. त्यानंतर कॅनडाने पाकिस्तानला विजयासाठी 107 धावांचे सोपे आव्हान दिले. कॅनडाने 20 षटकात 7 बाद 106 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने 17.3 षटकात 3 बाद 107 धावा जमवित विजय नेंदविला.

मोहम्मद रिझवान आणि सईम आयुब यानी डावाला सावध सुरूवात करून दिली.  कॅनडाचा गॉर्डन आणि हेलिगर यांनी अचुक टप्प्यावर गोलंदाजी केल्यावर पाकला फटकेबाजी करता आली नाही. पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेलिगरने आयुबला मोव्हाकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 6 धावा जमविल्या.

रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यानी एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हालता ठेवला. 15 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेलिगरने बाबर आझमला मोव्हाकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 33 धावा जमविल्या. बाबर आझम बाद झाला त्यावेळी पाकला विजयासाठी 24 धावांची जरूरी होती. गॉर्डनने फखर झमानला झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. रिझवान आणि उस्मान खान यानी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. उस्मान खानने गॉर्डनच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 2 विजयी धावा घेतल्या.

मोहम्मद रिझवानने 53 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 53 तर उस्मान खानने नाबाद 2 धावा केल्या. पाकतर्फे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवलेले हे सर्वात संथ अर्धशतक आहे. पाकला अवांतर 9 धावा मिळाल्या. पॉवरप्लेमध्ये 6 षटकात पाकने 28 धावा जमविताना 1 गडी गमविला. पाकचे अर्धशतक 55 चेंडूत तर शतक 101 चेंडूत नेंदविले गेले. 10 षटकाअखेर पाकने 1 बाद 59 धावापर्यंत मजल मारली होती. रिझवान आणि बाबर आझम यानी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 59 चेंडूत नोंदविली. रिझवानने 52 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पाकच्या डावात 2 षटकार आणि 3 चौकार नेंदविले गेले. कॅनडातर्फे हेलिगरने 18 धावात 2 तर गॉर्डनने 17 धावात 1 गडी बाद केला.

जॉन्सनची एकाकी लढत

पाकने नाणेफेक जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या भेदक वेगवान माऱ्यासमोर कॅनडाला 20 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. कॅनडातर्फे सलामीच्या अॅरॉन जॉन्सनने शानदार अर्धशतक झळकवले. तो सातव्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. जॉन्सन आणि धालिवाल या सलामीच्या जोडीने 18 चेंडूत 20 धावांची भागिदारी केली. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धालिवाल मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 4 धावा जमविल्या. शाहिन आफ्रिदीने परगत सिंगला झमानकरवी झेलबाद केले. त्याने 2 धावा जमविल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला निकोलास किर्टन केवळ 1 धाव जमवित तंबूत परतला. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो इमाद वासिमच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. हॅरिस रौफने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोव्हाला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 2 धावा जमविल्या. रौफने या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींदरपाल सिंगला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. कॅनडाचा निम्मा संघ 9.5 षटकात 54 धावांची भर घालत तंबूत परतला होता. जॉन्सन आणि कर्णधार जाफर यांनी सहाव्या गड्यासाठी 19 धावांची भर घातली. जॉन्सनने 44 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. नसिम शहाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो त्रिफळाचीत झाला. जॉन्सनने आपले अर्धशतक 39 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविले. मोहम्मद अमीरने कर्णधार जाफरला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारास 10 धावा जमविल्या. कलिम सना आणि हेलीगर यांनी आठव्या गड्यासाठी 19 धावांची भर घातली. सनाने 14 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 13 तर हेलीगरने 11 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. कॅनडाच्या डावात 13 अवांतर धावा मिळाल्या. पाकच्या गोलंदाजांनी 10 वाईड चेंडू टाकले. कॅनडाच्या डावामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. कॅनडाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 2 गडी गमविले. कॅनडाचे अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 117 चेंडूत फलकावर लागले. पाकतर्फे मोहम्मद आमीर आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 2 तर शाहिन आफ्रिदी आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - कॅनडा : 20 षटकात 7 बाद 106 (जॉन्सन 44 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 52, जाफर 10, सना नाबाद 13, हेलीगर नाबाद 9, अवांतर 13, मोहम्मद आमीर 2-13, हॅरिस रौफ 2-26, शाहिन आफ्रिदी 1-21, नसीम शहा 1-24).

पाक : 17.3 षटकात 3 बाद 107 (मोहम्मद रिझवान 53 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 53, सईम आयुब 6, बाबर आझम 33 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 33, फखर झमान 4, उस्मान खान नाबाद 2, अवांतर 9, हेलीगर 2-18, गॉर्डन 1-17).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#Sport
Next Article