For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-आयर्लंड लढतीवर पाकचे भवितव्य अवलंबून

06:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका आयर्लंड लढतीवर पाकचे भवितव्य अवलंबून
Advertisement

वृत्तसंस्था /तारौबा (त्रिनिदाद)

Advertisement

लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आज शुक्रवारी होणाऱ्या अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील गट ‘अ’मधील सामन्याच्या निकालाकडे पाकिस्तानची नजर लागून राहिलेली असेल. या गटात चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेला आज विजय मिळाल्यास तीन सामन्यांतून दोन गुण झालेल्या पाकिस्तानची विश्वचषक मोहीम संपुष्टात येईल आणि या गटातून भारतासह अमेरिका सुपर एटमध्ये पोहोचेल. आयर्लंडकडे अनेक अनुभवी खेळाडू असले, तरी सध्या हा संघ सूर हरवल्यागत दिसत आहे आणि या क्षणी चांगले टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या अमेरिकेचे आव्हान त्यांना जड जाऊ शकते. अमेरिका कर्णधार मोनांक पटेलच्या तंदुऊस्तीवर लक्ष ठेवून असेल. तो बुधवारी भारताविऊद्धच्या सामन्यात डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे अॅरॉन जोन्सने कर्णधारपदाची जबाबदारी पेलली होती. हवामानाच्या अंदाजानुसार सामन्याला जोरदार पावसाचा धोका आहे आणि सामना पावसात वाहून गेल्यास देखील पाकिस्तानची मोहीम संपुष्टात येईल. कारण ते अमेरिकेला पाच गुणांवर घेऊन जाईल आणि त्यांना मागे टाकणे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर जाईल. पाक संघ आता जास्तीत जास्त चार गुण नोंदवू शकतो.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement

अफगाणिस्तानची गाठ पापुआ न्यू गिनीशी

अफगाणिस्तान येथे आज होणार असलेल्या सामन्यात अननुभवी पापुआ न्यू गिनीला नामोहरम करून टी-20 विश्वचषकाच्या ‘सुपर एट’मध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने आणखी एक अष्टपैलू प्रयत्न करेल. त्याचा परिणाम म्हणजे आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावलेला न्यूझीलंड स्पर्धेतून बाद होईल. आज विजय मिळाल्यास रशिद खानचा संघ ’क’ गटातून वेस्ट इंडिजसमवेत ‘सुपर एट’मध्ये पोहोचेल. रहमानुल्ला गुरबाज (156 धावा) आणि फझलहक फाऊकी (9 बळी) हे सध्या  अनुक्रमे धावा काढण्याच्या बाबतीत आणि बळी मिळविण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. या आयसीसी स्पर्धेतील संघाच्या उत्तम वाटचालीचे प्रतिबिंब त्यात पडते. गुरबाजव्यतिरिक्त अनुभवी इब्राहिम झद्रनने देखील अफगाणिस्तानच्या डावात चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज फाऊकीने रशिदसोबत चांगली छाप पाडली आहे. रशिदने आतापर्यंत दोन सामन्यांत सहा बळी घेतले आहेत. प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी मिळणार नाही याची संघाने काळजी घेतलेली आहे. पापुआ न्यू गिनी हा एक उत्साही संघ असला, तरी अफगाणिस्तानवर मात करणे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडील वाटते.

 सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.