For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमेपलिकडील दहशतवादाला पाकचे प्रोत्साहन

06:26 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमेपलिकडील दहशतवादाला पाकचे प्रोत्साहन
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

प्रत्येक देशाला एक स्थिर व चांगला शेजारी हवा असतो, परंतु जो शेजारी दहशतवादाला खतपाणी घालत असेल व तेथे घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्यासोबतचे असणारे आपले संबंध कसे प्रस्तापित करावे लागेल असा प्रशन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताचा शेजारील देश पाकीस्तानच्या दहशतवादाच्या भूमिकेवरुन मांडली आहे. ते सिंगापूर येथील एनयूएस इंन्स्टीट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीजमध्ये बोलत होते.

भारताची सध्याची भूमिका ही दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याची राहिली नसून सीमेपलिकडील दहशतवाद मोडीत काढण्यासाठी नवेनवे मार्ग शोधण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही जयशंकर यांनी यावेळी म्हटले आहे. कारण दहशतवादाच्या संदर्भात कारवाया या फक्त दररोज नवीन संकटाना आमंत्रण देत असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

या संदर्भात निराधार युक्तिवादाची पुनरावृत्ती केल्याने अशा दाव्यांना कोणतीही  ठोस दावा मिळत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. येथील लोकांना आमच्या विकास कार्यक्रमांचा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा फायदा होणार असल्याचा दावाही मंत्री जय शकर यांनी यावेळी केला आहे.

अरुणाचलवरील चीनचा दावा ही बाब हास्यास्पद

चीनसोबतचे संबंध आणि अरुणाचल प्रदेशबाबतच्या अलिकडील झालेल्या टीकेला उत्तर देताना, जयशंकर यांनी म्हटले की, बिजिंगचे वारंवार अरुणाच प्रदेशावरील दावे हे हास्यास्पद राहिले आहे. तसेच हा भारताचा भूप्रदेश ही भारताची सीमारेषा असून हा नैसर्गिक भाग असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement
Tags :

.