पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला
हवाई हल्ल्यात 4 इराणी मुलांसह 9 जण ठार : संघर्ष भडकण्याची चिन्हे
वृत्तसंस्था /तेहरान, इस्लामाबाद
इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अ•s उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननेही गुऊवारी पहाटे प्रतिहल्ला केला. पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 लोक ठार झाले. या हल्ल्यात 3 महिला आणि 4 मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. मात्र नंतर ही संख्या वाढून 9 झाली. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि इराणमध्ये युद्ध भडकण्याची शक्मयता आहे. दरम्यान, पाकिस्तानने इराणला ‘संयम’ ठेवण्याचा इशारा दिल्याचेही वृत्त आहे.
इराणवर पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केले आहेत. यावेळी लढाऊ विमाने पाकिस्तानी हवाई हद्दीत होती. मानवरहित हवाई वाहनांद्वारे शोध घेतल्यानंतर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी होताच हल्ल्यासाठी एकूण सात लक्ष्य निवडण्यात आली. या हल्ल्यात कोणत्याही इराणी नागरिक किंवा लष्करी जवानांना लक्ष्य करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. गुऊवारी पहाटे 4.50 वाजता सारवान शहराच्या परिसरात अनेक स्फोट ऐकू आले, असे वरिष्ठ अधिकारी अलीरेझा मरहमती यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने सांगितले. पाकिस्तानने इराणच्या सीमावर्ती गावांपैकी एकावर क्षेपणास्त्र डागल्याचे तपासानंतर आमच्या निदर्शनास आल्याचे स्पष्ट करण्यात आले. सारवान शहराजवळ अन्य एका ठिकाणीही स्फोट झाला असला तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बलुचिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच खवळला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारपासून इराणमधून आपल्या राजदुताला परत बोलावत नियोजित सर्व द्विपक्षीय भेटी स्थगित केल्या. तसेच इराणच्या राजदुतालाही पाकिस्तानने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे. याचदरम्यान पाकिस्तानने इराणला संयम बाळगण्याची विनंती करतानाच दोन शेजारी देशांमधील तणाव आणखी वाढेल अशी कोणतीही पावले न उचलण्याचे आवाहन केले आहे.
अनेक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा
पाकिस्तानने गुरुवारी पहाटे इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी लक्ष्यांना टार्गेट करत लष्करी हल्ले केले. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुऊवारी सकाळी यासंबंधी एक निवेदनही जारी केले. दुसरीकडे, इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने पाकिस्तानने सीमावर्ती गावात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन महिला आणि चार मुलांसह नऊ जण ठार झाल्याचे स्पष्ट केले.
इराण-पाकिस्तान संघर्षामुळे चिंता
इराणचा हल्ला आणि पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यांनी पश्चिम आशियातील अस्थिर प्रदेशात चिंता वाढली आहे. गाझापट्टीत हमास विऊद्ध इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केल्यामुळे आधीच तणावग्रस्त आहे. त्यातच आता आशिया विभागात इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाल्यामुळे चिंतेचे ढग वाढले आहेत.