For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचराला अटक

12:27 PM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोवा शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचराला अटक
Advertisement

उत्तर प्रदेश एटीएस विभागाने केली कारवाई

Advertisement

पणजी : गोवा शिपयार्डमध्ये नौदल तळावर काम करणाऱ्या संशयिताला उत्तर प्रदेश   दहशतवाद विरोधी पथकने (एटीएस) अटक केली आहे. नौदलाशी संबंधित गुप्त आणि महत्वपूर्ण माहिती संशयित पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला (आयएसआय) पुरवित असल्याचा त्याच्यावर संशय आहे. उत्तर प्रदेश एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव राम सिंग (31 वर्षे, गोरखपूर-उत्तर प्रदेश) असे आहे. शिपयार्डमध्ये तो जहाजाच्या दुऊस्तीचे काम करीत होता. संशयित राम सिंग याच्या बाबत उत्तर प्रदेश एटीएस विभागाला माहिती मिळताच त्यांनी गुप्तपणे कारवाई केली. संशयिताला (हनी ट्रॅपमध्ये अडकविला म्हणजे त्याला महिलेचा नाद लावला) व्यवस्थितपणे जाळ्यात अडकविला आणि तो नक्की काय करतो याबाबत त्या महिलेने त्याच्याकडून जाणून घेतले. तिला मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावरील संशय बळावल्यान उत्तर प्रदेश एटीएस विभागाने गोव्यात येऊन त्याला अटक केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.