महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानी घुसखोराला सांबामध्ये कंठस्नान

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /जम्मू

Advertisement

जम्मू काश्मीरमधील सांबा जिह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला आहे. बुधवारी रात्री 10 वाजता खोरा पोस्टजवळ घुसखोर भारतीय हद्दीत घुसताना दिसल्यानंतर त्याला कंठस्नान घालण्यात आल्याचे बीएसएफचे आयजी डी. के. बुरा यांनी गुऊवारी  सांगितले. घुसखोराची ओळख आणि हेतू स्पष्ट झालेला नाही. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. बीएसएफ जवानांच्या इशाऱ्यानंतरही घुसखोर थांबला नाही, त्यानंतर गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. घुसखोर भारत-पाकिस्तान सीमेची शून्य रेषा ओलांडत होता. ही रेषा पार करणे हे सीमा प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्यामुळेच सुरक्षा जवानांनी संबंधित घुसखोराचा खात्मा केला. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर, पोलीस आणि बीएसएफ जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात संयुक्त शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान, अन्य एका घटनेत राजौरी जिह्यातील कालाकोट परिसरात दहशतवादी लपण्याचे ठिकाण सापडले आहे. येथे एके रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article