कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्वचषक हॉकी स्पर्धेतून पाकची माघार

05:33 AM Oct 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतून पाक हॉकी संघाने माघार घेतली असल्याची माहिती शुक्रवारी हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली. सदर स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत पाकचा संघ हा बदली संघ असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान तामिळनाडूमध्ये 2025 च्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पाक हॉकी संघ सुरूवातीलाच पात्र ठरला होता. पण पाक हॉकी फेडरेशनने या स्पर्धेसाठी पाकचा संघ पाठविला जाणार नसल्याची घोषणा केली आहे. आता पाकच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाची घोषणा लवकरच केली जाईल, अशी आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या प्रवक्त्याने केली आहे.

Advertisement

आगामी होणाऱ्या या स्पर्धेत पाक संघाचा ब गटात समावेश होता. या गटात यजमान भारत, चिली आणि स्वीस यांचाही सहभाग आहे. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे झालेल्या पुरूषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतून पाक संघाने माघार घेतली होती. दरम्यान भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतून माघार घेण्याची पाकची ही दुसरी खेप आहे. 22 एप्रिल रोजी पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाक यांच्यातील क्रीडा संबंध पूर्णपणे बिघडले होते. पण विविध देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारत आणि पाक यांच्यातील सामने खेळविले जातील. पण द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन्ही देश परस्पर विरोधी खेळणार नाहीत, अशी नवी घोषणा भारतीय शासनाने घेतली आहे. अलिकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते.

हॉकी इंडियाचे विधान

भारतात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतून पाकने माघार घेतल्याच्या बातमी संदर्भात हॉकी इंडियाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आपल्याला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून अशी कोणतीच माहिती अद्याप मिळालेली नाही. दीड महिन्यांपूर्वी आपण पाक हॉकी फेडरेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याचे हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी सांगितले. भारतात होणारी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करणे हे हॉकी इंडियाचे उद्दिष्ट असून यजमान भारताला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे प्रयत्न चालु आहेत. दरम्यान सदर स्पर्धा त्रयस्त ठिकाणी खेळविल्यास पाकचा संघ सहभागी होईल, असे पीएचएफने म्हटले आहे. भारत आणि पाक यांच्यातील सध्या तणावग्रस्त संबंध असल्याने पाकचा कनिष्ठ पुरूषांचा हॉकी संघ या स्पर्धेसाठी न पाठविण्याचा निर्णय पीएचएफने घेतला असल्याचे पाक हॉकी फेडरेशनचे सरचिटणीस राणा मुजाहीद यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article