पाकचा झिम्बाब्वेवर मालिका विजय
बुलावायो : पाक क्रिकेट संघाने झिम्बाब्वेच्या दौऱ्यात यजमान झिम्बाब्वेचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात पाकने झिम्बाब्वेचा 99 धावांनी पराभव केला. पाकच्या सईम आयुबला ‘मालिकावीर’, तर कमरान गुलामला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकने 50 षटकात 6 बाद 303 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 40.1 षटकात 204 धावांत आटोपला.
पाकच्या डावामध्ये कमरान गुलामने 99 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 103 तर अब्दुला शफीकने 68 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50, सईम आयुबने 37 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31, कर्णधार मोहम्मद रिझवानने 47 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37, सलमान आगाने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, तयाब ताहीरने 16 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे सिकंदर रझा आणि निगरेव्हा यांनी प्रत्येकी 2 तर मुझारबनी आणि फराज आक्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकच्या डावात 8 षटकार आणि 30 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावलफक
पाक 50 षटकात 6 बाद 303 (कमरान गुलाम 103, अब्दुला शफीक 50, मोहम्मद रिझवान 37, सलमान आगा 30, सईम आयुब 31, तयाबताहीर 29, अवांतर 15, सिकंदर रझा, निगरेव्हा प्रत्येकी 2 बळी, मुझारबनी आणि आक्रमक प्रत्येकी 1 बळी), झिम्बाब्वे 40.1 षटकात सर्वबाद 204 (एर्व्हिन 51, टेडीवानशे 24, विलियम्स 24, बेनेट 37, मदांडे 20, निगरेव्हा 17, सईम आयुब, अब्रार अहम्मद, हॅरिस रौप आणि अमिर जमाल प्रत्येकी 2 बळी, फैजल आक्रमक आणि गुलाम प्रत्येकी 1 बळी)