कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचे काहीच बिघडवू शकणार नाही पाक

06:32 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केवळ 5 मिनिटात तयार होते हवाई सुरक्षा यंत्रणा

Advertisement

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे स्वत:चा सूड उगविला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी अ•dयांना लक्ष्य करत अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या ऑपरेशनद्वारे भारतीय सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. मध्यरात्री झालेल्या या कारवाईने भेदरलेला पाकिस्तान आता दर्पोक्ती करत आहे. भारताच्या या कारवाईला प्रत्युत्तर देणार असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे, परंतु पाकिस्तानच्या कुठल्याही आगळीकीला रोखण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे.

Advertisement

पाकिस्तान चिनी क्षेपणास्त्रs डागून भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा कुठल्याही स्थितीसाठी भारत जगातील सर्वोत्कृष्ट हवाई सुरक्षा प्रणाली एस-400 सह तयार आहे. भारताचा प्रमुख संरक्षण सहकारी रशियाकडून निर्मित एस-400 जगातील सर्वात प्रभावी हवाई सुरक्षा प्रणालींपैकी एक असून ती शत्रूच्या कुठल्याही हवाई हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी केवळ 5 मिनिटात तयार होते.

एस-400 ट्रायम्फ सरफेस टू एअर मोबाइल डिफेन्स सिस्टीम आहे. भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये रशियासोबत 5 एस-400 ट्रायम्फ मिसाइल सिस्टीम रेजिमेंटसाठी करार केला होता. या कराराचे मूल्य 5.43 अब्ज डॉलर्स आहे. यातील 3 रेजिमेंट भारताला प्राप्त झाल्या असून उर्वरित 2 रेजिमेंट ऑगस्ट 2026 पर्यंत भारतात तैनात केल्या जाणार आहेत.

का खास आहे एस-400?

एस-400 चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांनी युक्त आहे. यात 40एन6ई (400 किमीचा मारक पल्ला), 48एन6ई3 (250 किमी), 9एम96ई2 (120 किमी) आणि 9एम96ई (40 किमी) क्षेपणास्त्र सामील आहे. एस-400 मिसाइल सिस्टीम 400 किलोमीटरचे अंतर आणि 30 किलोमीटरच्या उंचीपर्यंत कुठलेही विमान, ड्रोन, क्रूज क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यासारख्या  लक्ष्यांना अचूकपणे ट्रॅक करत त्यांना आकाशातच नष्ट करू शकते. याचबरोबर सुमारे 300 टार्गेट्सनाच एकाचवेळी ट्रॅक करू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article