कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वनडे मालिकेत पाककडून लंकेचा ‘व्हाईटवॉश’

06:58 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 वृत्तसंस्था / रावळपिंडी

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान पाकिस्तानने लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकने लंकेचा सहा गड्यांनी पराभव केला. पाकच्या मोहम्मद वासीमला ‘सामनावीर’ तर पाकच्या हॅरिस रौफला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेचा डाव 45.2 षटकात 211 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 44.4 षटकात 4 बाद 215 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.

लंकेच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. समरविक्रमाने 65 चेंडूत 2 चौकारांसह 48, कर्णधार कुशल मेंडीसने 54 चेंडूत 3 चौकारांसह 34, पवन रत्ननायकेने 37 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 32, कमिल मिशाराने 30 चेंडूत 5 चौकारांसह 29, निशांकाने 27 चेंडूत 4 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कमिंदु मेंडीसने 2 चौकारांसह 10 धावा केल्या. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. निशांका आणि मिशारा यांनी सलामीच्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. त्यानंतर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 57 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 128 धावा जमविताना 6 गडी गमविले. शेवटच्या 10 षटकामध्ये लंकेने 26 धावा जमविताना 3 गडी गमविले. पाकतर्फे मोहम्मद वासीमने 47 धावांत 3 तर हॅरिस रौफ, फैजल अक्रम यांनी प्रत्येकी 2 तर शाहीन आफ्रिदी व फईम अशरफ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. चौथ्या षटकातच त्यांचा सलामीचा फलंदाज हसीबुल्ला खान खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. फक्र झमान आणि बाबर आझम यांनी संघाचा डाव सावरताना 74 धावांची भागिदारी केली. फक्र झमानने 45 चेंडूत 8 चौकारांसह 55 धावा जमविल्या. झमानने आपले अर्धशतक 39 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. बाबर आझमने 52 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावा केल्या. सलमान आगा केवळ 6 धावांवर तंबूत परतला. पाकची यावेळी स्थिती 24.3 षटकात 4 बाद 115 अशी होती. मोहम्मद रिझवान आणि हुसेन तलत या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य शतकी भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. रिझवानने 92 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 61 तर हुसेन तलतने 57 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 42 धावा जमविल्या. 44.4 षटकात पाकने 4 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावा जमवित विजय मिळविला. पाकच्या डावामध्ये 17 चौकार नोंदविले गेले. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 3 गडी गमविताना 139 धावा जमविल्या. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये पाकने 30 धावा जमविल्या. पाकने हा सामना 32 चेंडू बाकी ठेवून जिंकला. लंकेतर्फे व्हँडेरसेने 42 धावांत 3 तर तिक्ष्णाने 37 धावांत 1 गडी बाद केला.

पाक-लंका यांच्यातील ही वनडे मालिका संपली असता आता पाकमध्ये तिरंगी टी-20 मालिका खेळविली जात आहे. या तिरंगी मालिकेत झिम्बाब्वे, पाक आणि लंका यांचा समावेश असून या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत मंगळवारी होत आहे. गेल्या मंगळवारी इस्लामाबाद येथे न्यायालयाच्या परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोटात 12 जण ठार झाल्याने लंकन संघ मायदेशी परतण्याच्या विचारात होता. पण पाक क्रिकेट मंडळाने लंकन संघाला पुरेशी सुरक्षा व्यवस्थेची हमी दिल्याने लंकेचा संघ आता तिरंगी टी-20 मालिकेत खेळणार असल्याचे लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.

संक्षिप्त धावफलक: लंका 45.2 षटकात सर्वबाद 211 (समर विक्रमा 48, कुशल मेंडीस 34, रत्ननायके 32, कमिल मिशारा 29, निशांका 24, अवांतर 12, मोहम्मद वासीम 3-47, हॅरीस रौफ आणि फैजल अक्रम प्रत्येकी 2 बळी, फईम अशरफ व शाहीन आफ्रिदी प्रत्येकी 1 बळी). पाक 44.4 षटकात 4 बाद 215 (मोहम्मद रिझवान नाबाद 61, हुसेन तलत नाबाद 42, फक्र झमान 55, बाबर आझम 34, अवांतर 17, व्हँडेरसी 3-42, तिक्ष्णा 1-37).

Advertisement
Tags :
#tarunbharatnews
Next Article