संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर साधला निशाणा
दहशतवादाच्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावले आहे. सीमापार दहशतवादामुळे भारताला झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या प्रतिनिधीने पाकिस्तानचा थेट उल्लेख टाळून त्याच्यावर निशाणा साधला आहे. दहशतवादी गट सीमेपलिकडून ड्रोनचा वापर करत अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करतात अशी टिप्पणी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेतील ‘स्मॉल आर्म्स’वरील चर्चेवेळी केली आहे.
अनेक दशकांपासून दहशतवादाच्या संकटाला तोंड दिल्यावर भारत दहशतवाद्यांकडून होणाऱ्या छोटी शस्त्रs आणि दारूगोळ्याच्या तस्करीच्या धोक्याबद्दल जाणून आहे. या दहशतवादी संघटनांकडील शस्त्रास्त्रांचे प्रमाण पाहता ते अन्य देशाच्या समर्थनाशिवाय अस्तित्वात राहू शकत नसल्याचे स्पष्ट होते, असे म्हणत कंबोज यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी कंबोज यांनी यापूर्वी पाकिस्तानला फटकारले होते. कंबोज यांनी
ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या नव्या स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्या संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयात भारताच्या पहिल्या महिला राजदूत आहेत. रुचिरा कंबोज या 1987 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी आहेत.