पाकचा लंका दौरा जानेवारीत
वृत्तसंस्था / लाहोर
पाकचा क्रिकेट संघ जानेवारी महिन्यात लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. पुढील वर्षी भारतामध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होत असल्याने पाकचा हा लंका दौरा महत्त्वाचा असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाक आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 चे तीन सामने 7, 9, 11 जानेवारीला डंबुलामध्ये खेळविले जातील. तसेच जानेवारी अखेरीस पाकचा संघ मायदेशात तीन सामन्यांची टी-20 मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. ही मालिका 30 जानेवारीपासून सुरू होईल. आयसीसीच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत पाक संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. सदर स्पर्धा भारत आणि श्ा़dरीलंका यांच्यात संयुक्त यजमानपदाने 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. पाक संघाचे या स्पर्धेतील सर्व सामने कोलंबोत होतील.