For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईलद्वारे भारतीयांना ‘टार्गेट’ करतोय पाकिस्तान

06:32 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाईलद्वारे भारतीयांना ‘टार्गेट’ करतोय पाकिस्तान
Advertisement

केंद्र सरकारकडून हाय अलर्ट जारी : व्हॉट्सअॅप कॉलही रिसिव्ह न करण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार विभागाकडून भारतीयांना दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. यात भारतीयांना एका खास नंबरवरून येणाऱ्या कॉलसंबंधी संतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या नंबरवरून येणाऱ्या कॉलदरम्यान युजर्सला त्याचा मोबाईल नंबर बंद होणार असल्याचे तसेच मोबाईल नंबरवरून अवैध कारवाया झाल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

विदेशी मोबाईल नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सअॅप कॉलकरिता देखील दूरसंचार विभागाने सतर्क केले आहे. +92 अशी सुरुवात असलेल्या नंबरवरून हा कॉल येत असतो. हा कॉल रिसिव्ह केला जाऊ नये असे दूरसंचार विभागाने भारतीयांना सांगितले आहे. +92 हा पाकिस्तानी मोबाईल नंबरचा कंट्री कोड आहे. भारतीयांनी अशाप्रकारच्या मोबाईल कॉलपासून दूर रहावे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

हा कॉल पाकिस्तानातील सायबर गुन्हेगार करत आहेत. अशाप्रकारच्या कॉलच्या मदतीने पाकिस्तानी गुन्हेगार भारतीय युजर्सची वैयक्तिक माहिती चोरतात आणि मग सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक करत असल्याचा इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे.

दूरसंचार विभागाने अशाप्रकारचा कुठलाही कॉल रिसिव्ह न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशाप्रकारच्या कॉलवर कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती न देण्याची सूचना करण्यात आली. तसेच अशाप्रकारच्या कॉलप्रकरणी संचार साथी पोर्टलवर तक्रार करण्यात यावी. सायबर क्राइम विषयक हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू सायबर क्राइम डॉट गोव्ह डॉट इन’वर तक्रार करावी असे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.