For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी देश

06:47 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी देश
Advertisement

फिनलँड सर्वात आनंदी देश : अफगाणिस्तान यादीच्या तळाला

Advertisement

वृत्तसंस्था/ हेलसिंकी

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी समोर आली आहे. यंदाही नॉर्डिक देश (उत्तर युरोप आणि अटलांटिक देश) सर्वाधिक अंकांसोबत सर्वात आनंदी देश ठरले आहेत. फिनलंडने या यादीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळविले आहे. फिनलंड सलग 7 वर्षांपासून आनंदी देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे. यंदाचा हा अहवाल वयोगटाच्या आधारावर वेगवेगळे मानांकन सामील करणारा पहिला अहवाल ठरला आहे. तर दुसरीकडे भारतापेक्षा पाकिस्तानचे नागरिक अधिक आनंदी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

हा अहवाल युवांदरम्यान जीवन संतुष्टतेविषयी असलेली खराब स्थिती समोर आणणारा ठरला आहे. 143 देशांमधील लोकांच्या जागतिक सर्वेक्षण डाटावर हा अहवाल आधारित आहे. मागील तीन वर्षांमधील त्यांच्या सरासरी जीवन मूल्यांकनाच्या आधारावर देशांना स्थान देण्यात आले आहे.

उत्तर अमेरिकेत युवांदरम्यान आनंदी वृत्तीचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. तेथील युवा आता वृद्धांच्या तुलनेत कमी आनंदी आहेत. तर 2012 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेला आनंदी देशांच्या यादीत पहिल्या 20 देशांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. युरोपमधील अनेक देशांनी या मानांकनात मोठी झेप घेतल्याने अमेरिकेसह काही देश मागे पडले आहेत. या यादीत भारताला 126 वे स्थान मिळाले आहे. मागील वर्षी देखील भारत याच स्थानावर होता. तर आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानने या यादीत 108 स्थान मिळविले आहे.  यादीत अखेरचे स्थान अफगाणिस्तानला मिळाले आहे.

फिनलंडनंतर डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश आहे.  आइसलँड तिसऱ्या तर स्वीडन चौथ्या स्थानावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इस्रायलने यादीत 5 वे स्थान मिळ्रवले आहे. नेदरलँड 6 व्या, नॉर्वे 7 व्या, लक्झेमबर्ग 8 व्या आणि स्वीत्झर्लंड 9 व्या तर ऑस्ट्रेलिया 10 व्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 11 व्या, कोस्टा रिका 12 व्या, कुवैत 13 व्या, ऑस्ट्रिया 14 व्या तर कॅनडा 15 व्या स्थानावर आहे. ब्रिटनला या यादीत 20वे स्थान मिळाले आहे.

143 देशांमधील आनंदीपणा मोजण्यासाठी 6 मापदंडांवर आधारित प्रश्न तयार करण्यात आले होते. यात संबंधित देशांमधील दरडोई उत्पन्न, सामाजिक सहकार्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण, सामाजिक स्वातंत्र्य, तंदुरुस्त जीवनाच्या आधारावर मानांकन देण्यात आले.

Advertisement
Tags :

.