For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या वनडेत पाकची द.आफ्रिकेवर मात

06:27 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या वनडेत पाकची द आफ्रिकेवर मात
Advertisement

सामनावीर सलमान आगाची अष्टपैलू चमक, आयुबचे शतक, क्लासेनचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ पार्ल, द. आफ्रिका

सईम आयुबचे शतक व अष्टपैलू सलमान आगाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर 3 गड्यांनी विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाबाद 82 व 32 धावांत 4 बळी टिपणाऱ्या सलमान आगाला सामनावीराचा बहुमान मिळाला.

Advertisement

सलमानने 90 चेंडूत नाबाद 82 धावा जमवित 3 चेंडू बाकी ठेवत पाकला विजय मिळवून दिला. त्याआधी त्याने ऑफस्पिनवर 32 धावांत आघाडीच्या चार फलंदाजांना बाद केले होते. द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर निर्धारित 50 षटकांत 9 बाद 239 धावा जमविल्या. हेन्रिच क्लासेनने सर्वाधिक 86 धावा जमविल्या तर कर्णधार मार्करमने 35, रेयान रिकेल्टनने 36, टोनी झी झॉर्जीने 25 चेंडूत 33 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने आयुबचे शतक (119 चेंडूत 109) व सलमान आगाचे नाबाद अर्धशतकाच्या आधारे 49.3 षटकांत 7 बाद 242 धावा जमवित विजय साकार केला.

धावांचा पाठलाग करताना 20 व्या षटकात पाकची स्थिती 4 बाद 60 अशी नाजूक बनली होती. सलमानला 6 धावांवर असताना जीवदान मिळाले. त्याचा लाभ घेत संघाला विजय मिळवून देणारी खेळी केली. सुरुवातीला तो आयुबला साथ देण्याचे काम करीत होता. गेल्या शुक्रवारी झालेल्या टी-20 मध्ये सलमान 98 धावांवर नाबाद राहिला होता. पण यावेळी त्याने दुसरे वनडे शतक नोंदवताना 119 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 109 धावा केल्या. रबाडाने त्याला बाद केले. सलमानसमवेत त्याने पाचव्या गड्यासाठी 141 धावांची भागीदारी करीत संघाला विजयाची संधी निर्माण करून दिली. नसीम शहाला साथीला घेत सलमानने पाकला 3 गडी बाकी ठेवत विजय मिळवून दिला.

त्याआधी, झॉर्जी व रिकेल्टन यांनी द.आफ्रिकेला बिनबाद 70 असा फ्लाईंग स्टार्ट करून दिला होता. पण दोघेही दहाव्या व 12 व्या षटकात बाद झाल्यानंतर व्हान डर डुसेन व ट्रिस्टन स्टब्ज हेही लवकर बाद झाले. सलमानने त्यांना बाद केल्यानंतर द.आफ्रिकेची स्थितीही 4 बाद 88 अशी झाली होती. क्लासेन व कर्णधार मार्करम यांनी 73 धावांची भागीदारी करून डाव सावरला. 97 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 86 धावा जमविल्या असताना क्लासेनला शाहीन शहा आफ्रिदीने त्रिफळाचीत केले. रबाडा व जान्सेन यांनी आफ्रिकेला 9 बाद 239 धावांची मजल मारून दिली. अब्रार अहमदने 2, सईम आयुबने एक बळी मिळविला.

द.आफ्रिकेने या सामन्यासाठी नियमित कर्णधार टेम्बा बवुमा व जखमी केशव महाराज यांना विश्रांती दिली होती. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज गुरुवारी केपटाऊनमध्ये होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 239 : डी झॉर्जी 25 चेंडूत 33, रिकेल्टन 38 चेंडूत 36, मार्करम 54 चेंडूत 35, क्लासेन 97 चेंडूत 86, मार्को जान्सेन 10, रबाडा 11, बार्टमन नाबाद 10. गोलंदाजी : सलमान आगा 4-32, अब्रार अहमद 2-32, सईम आयुब 1-34.

पाकिस्तान 49.3 षटकांत 7 बाद 242 : सईम आयुब 119 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारासह 109, बाबर आजम 23, सलमान आगा 90 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 82, अवांतर 13. गोलंदाजी : रबाडा 2-48, बार्टमान -237, जान्सेन 1-45, शम्सी 1-54.

Advertisement
Tags :

.