कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानचा विंडीजवर 14 धावांनी विजय

06:31 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली टी-20 लढत : अर्धशतकवीर सईम आयुब ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / लॉडरहिल

Advertisement

पाकचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर असून उभय संघातील सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानने विजयी सलामी देताना विंडीजचा 14 धावांनी पराभव केला. अर्धशतक व 2 बळी मिळविणारा पाक संघातील सलामीचा फलंदाज सईम आयुबला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 6 बाद 178 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 7 बाद 164 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 14 धावांनी गमवावा लागला.

पाकच्या डावामध्ये सलामीच्या सईम आयुबने 38 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 57 धावा झळकविताना फक्र झमान समवेत दुसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. साहीबजादा फरहानने 12 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा केल्या. झमानने 24 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावांचे योगदान दिले. हसन नवाजने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 24, कर्णधार सलमान आगाने नाबाद 11, फईम अशरफने 9 चेंडूत 1 षटकारासह 15 तर मोहम्मद हॅरिसने 1 षटकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 8 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. पाकचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 66 चेंडूत तर दीड शतक 105 चेंडूत नोंदविले गेले. सईम आयुबने 34 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. विंडीजतर्फे शमार जोसेफने 30 धावांत 3 तर होल्डर, अकिल हुसेन आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजला 20 षटकात 164 धावांपर्यंत मजल मारता आली. चार्ल्स आणि अॅन्ड्य्रु या सलामीच्या जोडीने 67 चेंडूत 72 धावांची भागिदारी करत विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण त्यानंतर त्यांचा डाव कोलमडला. चार्ल्सने 51 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35 तर अॅन्ड्य्रुने 48 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 35 धावा जमविल्या. कर्णधार शाय होप केवळ 2 धावांवर बाद झाला. गुडाकेश मोतीला खातेही उघडता आले नाही. रुदरफोर्डने 1 चौकारांसह 11 तर चेसने 5 धावा केल्या. शेफर्डने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. शेफर्ड बाद झाला त्यावेळी विंडीजची स्थिती 16.1 षटकात 7 बाद 110 अशी होती. होल्डर आणि जोसेफ यांनी आठव्या गड्यासाठी 23 चेंडूत अभेद्य 54 धावांची भागिदारी केली. पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. होल्डरने 23 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 30 तर शमार जोसेफने 20 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 21 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 12 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविल्या. विंडीजचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 90 चेंडूत आणि दीडशतक 115 चेंडूत नोंदविले गेले. विंडीजने 10 षटकाअखेर बिनबाद 63 धावा जमविल्या होत्या. पाकतर्फे मोहम्मद नवाजने 23 धावांत 3 तर सईम आयुबने 20 धावांत 2 तसेच सुफीयान मुक्कीम आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 6 बाद 178 (सईम आयुब 57, फखर झमान 28, हसन नवाज 24, अशरफ 15, सलमान आगा नाबाद 11, फरहान 14, अवांतर 14, शमार जोसेफ 3-30, होल्डर, अकिल हुसेन आणि शेफर्ड प्रत्येकी 1 बळी), विंडीज 20 षटकात 7 बाद 164 (चार्ल्स 35, अॅन्ड्य्रु 35, रुदरफोर्ड 11, शेफर्ड 12, होल्डर नाबाद 30, शमार जोसेफ नाबाद 21, अवांतर 13, मोहम्मद नवाज 3-23, सईम आयुब 2-20, शाहीन आफ्रिदी व मुक्कीम प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article