महिला विश्वचषकात आज पाकिस्तान-बांगलादेश लढत
वृत्तसंस्था/ कोलंबो
महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील कमकुवत संघांपैकी एक म्हणून गणले जाणारे पाकिस्तान आणि बांगलादेश आज गुऊवारी येथे आयसीसी स्पर्धेत विजय मिळवण्याच्या उद्देशाने त्यांच्या स्पर्धेच्या मोहिमेची सुऊवात करतील. फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान रविवारी होणाऱ्या भारताविऊद्धच्या सामन्यासह श्रीलंकेच्या राजधानीत त्यांचे सर्व सामने खेळेल.
दोन्ही संघांनी पात्रता फेरीतून स्पर्धेत प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांगलादेशपेक्षा पात्रता स्पर्धेत वरचे अव्वल स्थान पटकावले होते आणि निगार सुलतानाच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघावरील वर्चस्व कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मागील विश्वचषकात दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी होते आणि पुढील तीन आठवड्यांत बलवान प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी त्यांना काही तरी खास करावे लागेल.
आम्हाला येथे (कोलंबोमध्ये) खेळण्याचा एक महत्त्वपूर्ण फायदा आहे. कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही आमचे सर्व सामने एकाच ठिकाणी आणि त्याच परिस्थितीत खेळणार आहोत. ही बाब आमच्या बाजूने काम करेल. निश्चितच, आमचे मुख्य ध्येय अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे आहे. श्रीलंकेतील परिस्थिती पाकिस्तानसारखीच आहे, त्यामुळे आम्हाला नेमक्या परिस्थितीची माहिती आहे, असे पाकिस्तानची कर्णधार सनाने म्हटले आहे.
दुसरीकडे, सुलताना म्हणाली की, बांगलादेश 2022 मध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या विश्वचषकाच्या तुलनेत यावेळी खूपच चांगला संघ आहे. हा आमचा दुसरा एकदिवसीय विश्वचषक आहे. यापूर्वी आम्ही अशा मोठ्या व्यासपीठावर जिंकण्याच्या बाबतीत अननुभवी आणि अपरिचित होतो. तथापि, तेव्हापासून, आम्ही मायदेशात आणि परदेशात खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि आता आम्हाला माहित आहे की, अशा स्पर्धेच्या वातावरणात सामने कसे जिंकायचे. आम्ही या विश्वचषकाकडे उत्सुकतेने पाहत आहोत. ही आम्हा सर्वांसाठी एक उत्तम संधी आहे, असे तिने सांगितले.
बांगलादेश संघात ज्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे लागेल त्यात उजव्या हाताची वेगवान गोलंदाज निशिता अक्तर निशी आणि या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकात खेळलेली अष्टपैलू सुमैया अक्तर यांचा समावेश होतो. पाकिस्तानला बिस्माह मारूफ आणि निदा दार यांच्या अनुभवाची उणीव भासेल. त्या आता संघाचा भाग नाहीत. परंतु सनाला वाटते की त्यांच्या अनुपस्थितीची भरपाई करण्याच्या दृष्टीने संघात पुरेशी प्रतिभा आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.