कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तान, बांगलादेशपुढे आज पत राखण्याचे लक्ष्य

06:50 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही संघ स्पर्धेबाहेर पडले असल्याने सामन्याला औपचारिक स्वरूप

Advertisement

वृत्तसंस्था/ रावळपिंडी

Advertisement

मायदेशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद राखण्याचे स्वप्न भंगलेला आणि टीकेचा सामना करणारा पाकिस्तान संघ आज गुऊवारी येथे तितक्याच कमकुवत बांगलादेशचा सामना करणार यावेळी पत सांभाळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. पाकिस्तानला न्यूझीलंड आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ते बाद होण्याच्या उंबरठ्यावर होते. किवींनी बांगलादेशवर विजय मिळवून त्यावर शिक्कामोर्तब केले.

29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या जागतिक स्पर्धेतील पाकिस्तानच्या प्रदर्शनाने नाराज झालेले चाहते आता देशाच्या क्रिकेट रचनेत व्यापक बदल करण्याची मागणी करत आहेत. 2024 च्या टी-20 विश्वचषक आणि 2023 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतून लवकर बाहेर पडल्यानंतर जागतिक मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या गट टप्प्यातच आव्हान संपुष्टात येण्याची पाकिस्तानची ही सलग तिसरी खेप आहे. विविध संघांनी आक्रमक दृष्टिकोन स्वीकारलेला असताना पाकिस्तान मात्र भूतकाळात अडकल्यासारखा वाटला आहे.

त्यांची वरची फळी निप्रभ ठरली असून धावा भराभर जमविण्यापेक्षा चेंडू खेळून काढणे याला त्यांचे प्राधान्य असल्यागत दिसले आहे. डावाला वेग देण्यासाठी 35 व्या षटकापर्यंत त्यांनी वाट पाहिलेली आहे. रावळपिंडीमध्ये न्यूझीलंडविऊद्ध 161 निर्धाव चेंडू आणि दुबईमध्ये भारताविऊद्ध 147 निर्धाव चेंडू त्यांची परिस्थिती दाखवून देताता. खराब फटके, निकृष्ट क्षेत्ररक्षण व दुखापतींमुळे पाकिस्तानचे संकट आणखी वाढले आहे. सलामीवीर फखर जमानच्या दुखापतीमुळे वरच्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि इमाम-उल-हक ती दूर करू शकलेला नाही.

 

स्टार फलंदाज बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान देखील अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. गरज असताना त्यांना फारसा प्रतिकार करता आलेला नाही. पाकिस्तान नेहमीच सामने जिंकण्यासाठी त्यांच्या जबरदस्त वेगवान माऱ्यावर अवलंबून राहिलेला आहे. परंतु यावेळी आघाडीचे जलद गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ हे कुचकामी दिसलेले आहेत. दुबई आणि कराचीतील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पाकिस्तानने अबरार अहमद या एकमेव फिरकीपटूची निवड केली. याचाही त्यांना फटका बसला.

पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशलाही भारत आणि न्यूझीलंडविऊद्ध सलग पराभव पत्करावे लागले आहेत. तौहिद हृदॉय, कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि जाकेर अली यांनी केलेला प्रतिकार वगळता त्यांची फलंदाजी मोठ्या प्रमाणात अपयशी ठरली आहे. घरच्या मैदानांवर फिरकीला अनुकूल परिस्थिती राहिलेली असूनही बांगला टायगर्सना फिरकी गोलंदाजांविऊद्ध संघर्ष करावा लागला आहे. महत्त्वाच्या क्षणी फायदा घेण्यास बांगलादेशची असमर्थता आणि विशेषत: ढिसाळ क्षेत्ररक्षण त्यांना महागात पडले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये सोडलेले झेल त्यांच्या संकटात आणखी भर घालून गेले. तथापि पाकिस्तानविऊद्ध बांगलादेशला त्यांची मोहीम विजयाने संपवण्याची आणि काही प्रमाणात पत राखण्याची संधी मिळू शकते.

संघ : पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झीद, हसन, तौहीद हृदॉय, मुशफिकुर रहीम, एम. डी. महमूद उल्लाह, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाय इमॉन, नसुम अहमद, तंजीम हसन साकीब, नाहिद राणा.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वा.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article