For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजर्षि शाहू विद्यालयात चित्रकला कार्यशाळा

06:05 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजर्षि शाहू विद्यालयात  चित्रकला कार्यशाळा
Advertisement

कुद्रेमनी/वार्ताहर

Advertisement

शिनोळी (ता. चंदगड) गावातील राजर्षि शाहू विद्यालयात चित्रकला कार्यशाळा नुकताच झाली. एलीमेंटरी व इंटरमेडिएट शासकीय रेखा कला स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शिनोळी औद्योगिक वसाहतीमधील जे. एन. भंडारी स्कूल ऑफ कला महाविद्यालयाचे प्रा. हातिफ पाच्छापुरे यांनी यावेळी वस्तुचित्र, स्मरण चित्र, संकल्प चित्र या विविध प्रकारांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध रंगकामांचे प्रात्याक्षिकही करून दाखविले व जीवनातील चित्रकलेचे महत्त्व विशद केले.

Advertisement

सहशिक्षक रवी पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमप्रसंगी एस. बी. कदम, विक्रम तुडयेकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.