महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आपल्या नेत्यांच्या वारंवारच्या अपमानामुळे वेदना

11:28 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या भावना

Advertisement

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल विधानपरिषदेत अपशब्द वापरल्यावरून काँग्रेस व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ड्रग्ज अॅडिक्ट म्हटले आहे. आमच्या नेत्यांचे अपमान खपवून घ्यायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रवी यांनी वापरलेल्या अपशब्दामुळे आपल्याला वेदना झाल्या आहेत, असे सांगत दु:ख व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत गुऊवारच्या घटनेसंबंधी त्यांनी माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे विधानपरिषदेत त्यांचा विरोध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत होती. याचवेळी सी. टी. रवी यांनी राहुल गांधी यांच्याबद्दलही अपशब्द वापरले. त्यांना ड्रग्ज अॅडिक्ट म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

आपण जे बोलले आहे त्यापासून मागे हटणार नाही. राहुल गांधी यांच्याबद्दल सातत्याने टीका होत असताना सभागृहात आपण कसे गप्प बसणार, तुमच्या हातूनही अपघात घडला आहे. या माध्यमातून तुम्ही त्यांचा खून केला आहात, असे बोलले आहे. त्यांनी मात्र आपण अपशब्द वापरलोच नाही, असे खोटे सांगत आहेत. यासंबंधी सर्वांजवळच व्हिडिओ आहे. लहानपणापासून आपण मुंगीही मारली नाही. सतत दहावेळा आपल्याबद्दल अपशब्द वापरले, असे सांगताना लक्ष्मी हेब्बाळकर यांचे दु:ख अनावर झाले. असे अपशब्द कसे सहन करणार? राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप होतातच. असे नीच राजकारण मात्र आपण पाहिले नाही. विधानपरिषद म्हणजे बुद्धिवंतांचे सभागृह, ज्येष्ठांचे सभागृह असे म्हणतात. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला आहे. आपल्याकडे बघून अनेक महिला राजकारणात येण्यासाठी प्रेरणा घेत आहेत. माझे कुटुंबीय व मतदारसंघातील जनतेने आपल्याला धीर दिल्याचेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

सी. टी. रवी तोंड फाटके

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही शुक्रवारी सकाळी या घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. सी. टी. रवी तोंड फाटके आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल त्यांनी यापूर्वी अपशब्द वापरले आहेत. सिद्धरामय्या यांना त्यांनी सिद्धरामुल्ला खान असे म्हटले होते. एकूण बारावेळा रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे, असे त्यांनी सांगितले. या विषयावर सभापतींनी का कारवाई केली नाही? असा प्रश्न विचारला असता त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. या प्रकरणातील त्यांची भूमिका नाराज करणारी आहे, असे सांगितले. सी. टी. रवी यांना पोलिसांनी रात्रभर फिरविले आहे. याविषयी शिवकुमार यांना विचारले असता पोलीस काय करीत आहेत, याची आपल्याला माहिती नाही. पोलीस ठाण्यात त्यांचे कुटुंबीय पोहोचले तर हरकत नाही. भाजप नेते जाणे किती योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article