For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाळ-मृदंगाच्या गजरात अष्टे येथील पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

10:16 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाळ मृदंगाच्या गजरात अष्टे येथील पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Advertisement

मुचंडी सिद्धेश्वर मंदिर येथून दिंडीला प्रारंभ : दिंडीचे आठवे वर्ष : वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह

Advertisement

वार्ताहर /किणये

टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठलनामाच्या जयघोषात अष्टे येथील पायी दिंडीचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. अष्टे येथील सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने अष्टे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा शनिवार दि. 29 रोजीपासून आयोजित करण्यात आला. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष असून  वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दिंडीचालक म्हणून हभप नागेंद्र सुभांजी महाराज हे आहेत. शनिवारी सकाळी मुचंडी येथील सिद्धेश्वर देवस्थान येथून या पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर हभप माऊती चौगुले यांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले. दिंडीचे उद्घाटन ग्रा.पं. अध्यक्ष बाळू कुरबर यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रॅक्टरचे पूजन यल्लाप्पा चौगुले यांनी केले. त्यानंतर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम... असा जयघोष करत दिंडीला सुऊवात झाली. दुपारी कलाप्पा शंकर ज्योती यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी लक्ष्मण पाटील यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. तालुक्याच्या विविध गावातील वारकरी आळंदी येथून निघालेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच काही गावातील वारकरी आपापल्या गावातून पायी दिंडीतून पंढरपूरला जात आहेत.

Advertisement

विठुनामाचा अखंड गजर

या पायी दिंडीत विठुनामाचा गजर करीत वारकरी चालत असतात. यामध्ये त्यांना ऊन पाऊस याची कसलीही पर्वा नसते. सारा भार विठ्ठलावर ठेवून अगदी आनंदाने हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने रोज ठराविक अंतर मार्गस्थ होतात. पंढरपूरच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळतो असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अलीकडे गावागावातूनही पायी दिंड्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.

अष्टे दिंडीमध्ये विविध भजन

अष्टे दिंडीत रोज सकाळी पायी दिंडीला सुऊवात झाल्यापासून दिवसभर दिंडीमध्ये विविध भजन सुरू आहेत. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी प्रवचन व काही ठिकाणी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ही दिंडी लक्कप्पा जबगौडर, सुदलाळ यांच्याकडे मुक्कामाला होती. दि 1 जुलै रोजी दंडीत ब्रदर्स होसुर, 2 जुलै रोजी गोकाक, 3 रोजी विठ्ठल मंदिर नागनूर, 4 रोजी विठ्ठल मंदिर मुडलगी, 5 रोजी हऊगिरी, 6 रोजी विठ्ठल मंदिर हल्ल्याळ, 7 रोजी गुंडेवाडी, 8 रोजी बसरगी, 9 रोजी महेश ढवळे जत, 10 रोजी बाबासाहेब पंढरीनाथ बोराडे शेगाव, 11 रोजी कडलास, 12 रोजी मांजरी, 13 रोजी कासेगाव शाळा या ठिकाणी मुक्काम होईल. 14 रोजी ही पायी दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

Advertisement
Tags :

.