For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pahalgam Attack Impact: हजारो सांगलीकरांकडून मे महिन्यातील काश्मिरचे बुकिंग रद्द

01:51 PM Apr 27, 2025 IST | Snehal Patil
pahalgam attack impact  हजारो सांगलीकरांकडून मे महिन्यातील काश्मिरचे बुकिंग रद्द
Advertisement

पर्यटकांना कोट्यवधीचा फटका, बुकींगचे पैसे विनाकट परत करण्याची मागणी 

Advertisement

सांगली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिर खोऱ्याकडे पर्यटनासाठी घळणारी जगभरातील पर्यटकांची पावले अचानक थबकली आहेत. मे महिन्यात सांगली जिल्ह्यातील सुमारे अकरा हजार पर्यटकांचे जम्मू काश्मिर खोऱ्यासह विविध स्थळांचे बुकींग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधींचा फटका पर्यटकांना बसण्याची शक्यता असून विमान कंपन्यांसह सर्व बुकींगचे पैसे बिनाकट परत मिळावेत, अशी मागणी पर्यटकांतून होऊ लागली आहे. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यापासून काश्मिर खोऱ्यातील युवकांना उदरनिर्वाहाचा मार्ग सापडला होता.

पर्यटकांच्या गर्दीने काश्मिर फुलून गेले होते. काश्मिरच्या लोकसंख्येच्या दीडपट पर्यटकांची गर्दी होत असल्याने यावर तिथले अर्थकारणही जोमात सुरू होते. २०१६ सालात ६० लाखांच्या आसपास काश्मिरमध्ये जाणारा पर्यटकांचा आकडा २०२० नंतर कोटींच्या घरात पोहोचला होता. गेल्या पाच वर्षापासून त्यामध्ये वर्षाला वाढ होत आहे. परंतु पहलगाम हल्ल्याने पर्यटनाचा ओघ अचानक थांबला. त्यामुळे काश्मिरी स्थानिकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह तर उभे केलेच पण पर्यटक व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे.

Advertisement

सांगलीत साधारण १० ते १२ पर्यटन कंपन्या कित्येक वर्षे पर्यटनात आपली सेवा देत आहेत. नशीब बलवत्तर किंवा ज्याचे त्याचे कौशल्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, या हल्ल्याच्या दुर्घटनेत सांगलीतील एकाही पर्यटकाला स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी धक्का लागू दिला नाही. प्रत्येकाने आपल्या पर्यटकांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्याने आपल्यातील कुठलाही पर्यटक पहेलगाम हल्ल्यात अडकला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील युबक सैन्य

शासनाने पर्यटकांच्या हिताचा निर्णय घ्यावा : सुशांत पाटील

सांगलीतील विविध पर्यटन कंपन्याकडून चार ते पाच वर्षात दरवर्षी सरासरी १२ ते पंधरा हजार पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जातात. मे महिन्यात काश्मिर पर्यटकांसाठी पर्वणी असतो. जम्मू काश्मिर, वैष्णोदेवी, लेह, लडाक, साठी मे महिन्यात ११ हजारांवर पर्यटकांचे बुकींग आहे. या पर्यटकांचे सरासरी ६५ हजार रूपयांचे पॅकेज आहे. पेहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर हे सर्व बुकींग रद्द करण्यात आले आहे. पण त्याचा आर्थिक फटका पर्यटकांना बसणार आहे.

त्याचा परिणाम सांगलीच्या पर्यटनावरही होणार आहे. त्यामुळे शासनाने यातून मार्ग काढावा, अशी मागणी सुशांत हॉलीडेजचे संचालक सुशांत पाटील यांनी केली आहे. विमान कंपन्यानी पैसे परत देण्याचे मान्य केले आहे. परंतु अन्य बुकींग खर्चही पर्यटकांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दलात असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना संरक्षण देऊन घरी पाठवण्यासाठी खूप मदत झाल्याचे सुशांत हॉलिडेसह कंपन्यांना आला.

पर्यटनाचा हंगाम सुरू

एप्रिल जरी संपून गेला असला तरी मे आणि जून आणि जुलैनंतर ०२ महिने अमरनाथ यात्रेचा कालावधी. म्हणजे पुढचे ०३ महिने सांगलीतून अकरा हजारांवर काश्मीर सहली संबंधित पर्यटन कंपन्यांकडे बुकींग आहे. विमान, हॉटेल, पर्यटन गाईडसह प्रति पर्यटक ६५ हजारांवर पॅकेज आहे. विमान कंपन्या आपला निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत असे चित्र तरी दिसायला लागलंय. पण लोकल हॉटेल्स, गाड्या, कार बुकिंग ईत्यादी अनेक व्यवस्थेत पर्यटन कंपन्याबरोबर पर्यटकांचे कोटयवधीचे अँडव्हान्स अडकले आहे. याच्या विनाकट परताव्याची तरतुद करावी, तशा सूचना देण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.