पद्मावती प्रीमियर लीग चषकाचे अनावरण
बेळगाव : श्री पद्मावती स्पोर्ट्स क्लब आयोजित जैन समाज मर्यादित पहिल्या पद्मावती प्रीमियर लीग प्रकाश झोतातील डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला गुऊवार दि. 11 डिसेंबरपासून युनियन जिमखाना मैदानावरती प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या चषकांचे अनावरण बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी विविध मान्यरांची उपस्थिती होती. तर स्पर्धेचा पहिला सामना गरूड स्मॅशर्स वि. धर्म ए.के. यांच्यात दुपारी 2.30 वाजता खेळविला जाणार आहे. या सामन्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेला चालना देण्यात येणार आहे. जैन सेवा संघातर्फे जैन समाज मर्यादित प्रथमच दिवस-रात्र प्रकाश झोतातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविली गेली आहे.
यावेळी अंकीत मुदकण्णवर, सागर महावीर सोलापुरकर, कॅम्प पोलीस स्टेशनचे एएसआय शांतीनाथ सोलापुरकर, दर्शन मीरहाळ,सचिन कुडची, महावीर सोलापुरकर यांची प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू सेठ, अनिल बेनके, संजय पाटील, उद्योजक व क्रीडाप्रेमी प्रणय शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, पुनित शेट्टी, अध्यक्ष सागर महावीर सोलापूर, संतोष आडव्याप्पा बडगेर तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील संपूर्ण तयारी झाले असून मैदान प्रकाश झोताने सज्ज करण्यात आले आहे.
आजचे सामने
- गरूड स्मॅशर्स वि. धर्म ए.के. दुपारी 2.30 वाजता
- डायनामिक राजा वि. जिनसेनमठ नंदिनी दुपारी 4 वाजता
- एस. आर. वॉरियर्स वि. रॉयल पाटील सायं. 5.30 वाजता
- जैन किंग्ज वि. शेट्टी किंग्ज सायं. 7 वाजता