For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पद्मावती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

11:22 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
पद्मावती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
Advertisement

बेळगाव : श्री पद्मावती स्पोर्ट्स क्लब आयोजित जैन समाज मर्यादित पहिल्या पद्मावती प्रीमियर लीग प्रकाश झोतातील डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला गुरुवार दि. 11 डिसेंबरपासून युनियन जिमखाना मैदानावरती प्रारंभ होत आहे. जैन समाजातर्फे प्रथमच दिवस-रात्र प्रकाश झोतातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला अंकित मुखन्नवर यांच्यातर्फे 55,555 व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 33,333 हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीरासाठी जैन युवक मंडळातर्फे सायकली बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी दर्शन राऊत यांच्याकडून सामनावीर पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू सेठ, अनिल बेनके, संजय पाटील, उद्योजक व क्रीडाप्रेमी प्रणय शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, पवन शेट्टी, अध्यक्ष सागर महावीर सोलापूर, आडव्याप्पा बडगेर तसेच जैन समाजातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील संपूर्ण तयारी झाले असून मैदान प्रकाश झोताने सज्ज करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.