दोड्डण्णावर स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
11:23 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/किणये
Advertisement
भरतेश शिक्षण संस्था संचलित हलगा येथील जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. अध्यक्षस्थानी बी. एस. कडेमनी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भरतेश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद दोड्डण्णावर होते. या स्पर्धांचे उद्घाटन एस. टी. शहापुरी, नीरज दोड्डण्णावर, बाबू देसाई, टी. पी. चौगुले, आर. एस. कुळगेकर, सविता पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे विनोद दोड्डण्णावर यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. जे. एल. कडेमनी व इतर मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी क्रीडा शिक्षक गितेश बखेडी व इतर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement