नंदगड परिसरात आता भातकापणीची लगबग
वार्ताहर/नंदगड
गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून भात कापणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारपासून भात कापणीला सुरुवात केली आहे. मंगळवारपासून पुन्हा या कामात शेतकरी व्यस्त राहणार आहेत. दरवर्षी दिवाळीपूर्वी पावसाळा संपतो. त्यामुळे दिवाळी संपताच शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त होतो. यावर्षी मात्र कित्येक दिवस पाऊस सुरूच राहिला. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. कमी पाण्याच्या जमिनीतील भातपिके कापणीसाठी आली होती. भात कापणीला उशीर झाल्यामुळे ती पिके जमिनीला टेकली आहेत. काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. परंतु भात कापणी करणे गरजेचे असल्याने शेतकरी पंधरा दिवसापासून कधी एकदाचा पाऊस जातो. याच्याच प्रतीक्षेत होता. अखेर दोन दिवसापासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे शेतकरी भात कापणी कामात व्यस्त झाला आहे.