Satara : चाफळ भागात भात काढणी, झोडणीच्या कामांना वेग!
चाफळमध्ये पारंपरिक आणि यांत्रिकी मळणीचा संगम
चाफळ : पाटण तालुक्यात यावर्षी पडलेल्या पावसामुळे सर्वच पिकांना पोषक असे वातावरण लाभले. अनुकूल वातावरणामुळे भात पीक चांगले आले असून सध्या चाफळ विभागात भात पिकाची काढणी व झोडणीची कामे वेगात सुरू असल्याचे चित्र शिवारात पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत भात कापणी करून खाटेवर झोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान, शेतीकामासाठी लागणाऱ्या मजुरांची शोधाशोध करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
चाफळसह विभागामध्ये भाताची काढणी वेगाने सुरू आहे. शेतकरी मळणी यंत्राबरोबर पारंपरिक पद्धतीने मळणी करत आहेत. चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असल्याने या ठिकाणी उताराची शेती भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे खाचरातून लावणीचा याठिकाणी स्थानिक जातीची भात पिके घेतली जातात.
यामध्ये तामसाळ, काळेभात, तांबडेभात, चिमणसाल, इंद्रायणी, वाळकेश्वर या भात जातीचा समावेश होतो. परंतु अलिकडच्या काळात शेतकरी सुधारित जातींना जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सुधारित जातीमधील इंद्रायणी, आर २४, पुसा बासमती, ३७०, पीएनआय २७१ अशा जातीची लागण मोठ्या प्रमाणात केली जाते.
शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती - झाल्यामुळे बैलाच्या सहाय्याने केली जाणारी मळणी तुरळक ठिकाणी पहावयास मिळत आहे. पूर्वी शेतात जमीन सपाट करून त्यावर शेणसडा टाकून खळे तयार केले - जायचे. खळ्याच्या मधोमध तिवडा उभा - करून त्या भोवती बैलांना बांधून खळ्यात भाताच्या पेंढ्या विस्कटून बैलांना फिरवले जात. मात्र कालानुरूप यामध्ये बदल होत गेला. चाफळसह विभागातील नाणेगाव, श्री दाढोली, केळोली, पाडळोशी, वीरेवाडी, घायटी परिसरात सर्रास शेतकरी लोखंडी न खाटचा वापर करून त्यावर भाताची ले झोहणी करत आहेत. भात काढणीसाठी ना मजुरांची तुटवडा भासत असल्याने त घरातील मंडळींच्या मदतीनेच शेतकऱ्यांना लिपिकांची काढणी, मळणी करावी लागत आहे.
मजुरांचा तुटवडा
शेतीमध्ये आलेल्या नवनवीन यांत्रिकीकारणामुळे आधीच मजुरांची संख्या कमी झालेली आहे. तर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मागेल तेवढी मजुरी देऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णपणे बिघडू लागली आहे