For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पड गए पंगे’ 30 ऑगस्टला येणार

06:55 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पड गए पंगे’ 30 ऑगस्टला येणार
Advertisement

चित्रपटाचे पोस्टर जारी

Advertisement

ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. या चित्रपटाचे नाव ‘पड गए पंगे’ आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून त्याचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. तसेच याच्या प्रदर्शनाची तारीखही उघड करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे पोस्टर अत्यंत मजेशीर आहे. फास दाखविण्यात आला असून तो झोपाळ्याच्या आकारातील आहे. त्यावर अभिनेता राजेश शर्मा बसल्याचे दर्शविण्यात आले आहे. चित्रपटात समर्पण सिंह या नव्या कलाकाराला संधी मिळाली आहे. हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

या चित्रपटात राजेश शर्मा, राजपाल यादव, फैसल मलिक आणि वर्षा रेखाटे हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती प्राची फिल्म्स आणि उत्तर अॅक्शनच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.