For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पूर्ण घर गिफ्टप्रमाणे केले पॅक

06:03 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
पूर्ण घर गिफ्टप्रमाणे केले पॅक

जेव्हा आईवडिल मुलांना काही काळासाठी घराची जबाबदारी सोपवून बाहेर जातात, तेव्हा मुले अधिक जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा असते. ही मुले मग  स्वत:च्या धारणेनुसार घरातील कामकाज करतात. अनेकदा मुलांचा खोडकरपणा आईवडिलांना डोक्यावर हात मारून घेण्यास भाग पाडतो. एका युवकाने देखील असेच केले असून त्याचे कुटुंब त्याला घरात 5 दिवसांसाठी एकटे सोडून गेले होते. मॅक्स नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने अलिकडेच टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो व्हायरल होत आहे. त्याच्या टिकटॉकवर 2.7 दशलक्ष फॉलोअर्स ओत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे अकौंट तुलनेत नवे आहे. हा युवक कुठला न कुठला प्रँक करत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसून येते. अलिकडेच त्याने कुटुंबावरच एक प्रँक केला आहे.

Advertisement

त्याचे कुटुंबीय 5 दिवसांसाठी सुटी व्यति करण्यासाठी गेले होते. जेव्हा तुमचे कुटुंबीय तुम्हाला घरी 5 दिवसांसाठी एकटे सोडून जातात तेव्हा असे त्याने स्वत:च्या व्हिडिओसोबत नमूद पेल आहे. युवकाने घरातील प्रत्येक कोपऱ्याला आणि प्रत्येक सामग्रीला रॅपिंग पेपरने पॅक केले आहे. या सर्व गोष्टींना त्याने एखाद्या गिफ्टचे स्वरुप दिले आहे.

सर्वप्रथम त्याने स्वत:च्या बहिणीच्या खोलीपासून याची सुरुवात केली. त्याने पुस्तके, कपाट आणि टीव्ही देखील पॅक केला. एका खोलीला पूर्णपणे गिफ्ट रॅप करण्यास त्याला एकूण 20 तास लागले आहेत. त्याने किचनला गिफ्ट रॅप केले आहे. यानंतर त्याने भिंतींवर, टेबल, सिंक अणि अशा प्रत्येक ठिकाणी सँटा आणि बेल्स लावले ज्यामुळे ती एखादी ख्रिसमसची गिफ्ट वाटू शकेल. त्याने विजेच्या उपकरणांनाही गिफ्ट रॅप केले होते.

Advertisement

कुटुंबीयांची प्रतिक्रिया

Advertisement

पूर्ण घराला गिफ्ट रॅप केल्यावर त्याने व्हिडिओत 92 तासांचे काम हे न झोपता पूर्ण झाले आहे, हे अत्यंत  अजब वाटत असल्याचे म्हटले आहे. त्याचे कुटुंबीय 5 दिवसांनी घरात आल्यावर तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. सर्व लोक काही वेळ अवाक् झाले आणि मग या सर्वांनी हा प्रँक पसंत केला आहे. मॅकच्या बहिणींनाही हा प्रँक अत्यंत पसंत पडला आहे.

Advertisement
Tags :
×

.