महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तरुणांमध्ये शेतीची आवड निर्माण करण्याची गरज ! पी. एन. पाटील यांचे सतेज कृषी प्रदर्शनामध्य़े आवाहन

12:55 PM Dec 26, 2023 IST | Abhijeet Khandekar
MLA P. N. Patil
Advertisement

वार्ताहर/कळंबा

चार दिवसांच्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून बळीराजाला कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती मिळाली उपयुक्त शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान तरुणांसाठी आणणे आवश्यक आहे. सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन बी- बियाणे शेती अवजारे यांची माहिती गेल्या पाच वर्षापासून दिली जात आहे. मात्र तरुण मुलांना शेतीसाठी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये पुढे आणणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पी.एन. पाटील यांनी सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी केले.

Advertisement

कळंबा येथील तपोवन मैदानावर २२ डिसेंबरपासून सुरु झालेल्या सतेज कृषी व पशु प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पी एन. पाटील यावेळी बोलत होते. सतेज कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे शेतीसाठी उपयुक्त नवीन तंत्रज्ञान तरुणांसाठी आणणे आवश्यक आहे. तसेच नवीन बदलत्या नवीन युगाच्या काळात युवकांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुण मुलांची शेतीकडे वळण्याची इच्छा झाली पाहिजे यासाठी नवनवीन तंत्रज्ञान येणारा भविष्य काळामध्ये समोर आणणे आवश्यक आहे. सध्या ऊस तोडणी मजुरांची मोठे संकट कारखानादारांपुढे आहे त्यामुळे कारखानदारी अडचणीत आहे. इस्त्राईलमध्ये शेतीसाठी पाण्याचा पुनर्वापर करून शेती केली जाते. अशी शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे तसेच नवीन शेतीला प्राधान्य देण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तसेच सतेज कृषी च्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान घेऊन येणारे कृषी प्रदर्शन भविष्यात ही शेतकऱ्यांना साठी उपयुक्त ठरणारे असेल असे प्रतिपादन आमदार पी. एन. पाटील यांनी केले.

Advertisement

याप्रसंगी आमदार सतेज पाटील प्रास्ताविकपर बोलताना म्हणाले नाविन्यपूर्ण असणारे हे सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक उपयोगी अशी माहिती देण्याचे काम करत आहे. प्रदर्शनामध्ये सुमारे नऊ कोटींची अर्थिक उलाढाल झाली आहे शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाले आहे. तसेच राधानगरीमध्ये रेशीम उद्योगाच्या माध्यमातून चार ते पाच लाखांपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीची शेती करून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांना मानसिक पाठबळ देण्याचे प्रोत्साहित करण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संजय बाबा घाटगे म्हणाले की शेती मधून कुटुंबाचा गाडा चालविणे आताच्या काळात अवघड बनले असून सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणांना अनेक नवनवीन कृषी विषयक नवी तंत्र शेतीमध्ये आणण्यासाठी कृषी प्रदर्शन हे उत्कृष्ट माध्यम ठरेल तसेच तरुणांनी या प्रदर्शनाचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळावे असे बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार सतेज पाटील, डी.वाय.पाटील ग्रुपचे विषवस्त तेजस पाटील, आमदार जयंत आसगावकर,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग देसाई,गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील,मार्केट कमिटी अध्यक्ष भुयेकर पाटील,कृषी महाविद्यालय डॉ. पिसाळ गोकुळचे सर्व संचालक,विनोद पाटील,धीरज पाटील यांची उपस्थिती होती.यावेळी प्रा.महादेव नरके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Advertisement
Tags :
MLA Satej PatilMLA Satej Patil Agricultural Exhibitionp n patiltarun bharat news
Next Article