महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा कायम

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

डॉ. पी. के. मिश्रा यांना पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कायम ठेवण्यात आले असून ते पंतप्रधानांचे सर्वाधिक काळ प्रमुख सल्लागार राहिले आहेत. माजी आयएएस अधिकारी अमित खरे आणि तऊण कपूर पुढील आदेशापर्यंत पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून काम पाहतील. डॉ. पी. के. मिश्रा यांना त्यांच्या कार्यकाळात पॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून पी. के. मिश्रा हे त्यांच्याशी संबंधित आहेत. त्यांचे पूर्ण नाव प्रमोद कुमार मिश्रा असे आहे. ते गुजरात केडरचे 1972 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. 2001-2004 दरम्यान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही मिश्रा यांनी त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले होते. केंद्र सरकारच्या कृषी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article