ओयोने दाखल केला आयपीओसाठी अर्ज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हॉटेल बुकिंगच्या क्षेत्रात कार्यरत भारतीय स्टार्टअप कंपनी ओयो हॉटेल्स लवकरच आपला आयपीओ सादर करणार असल्याची माहिती आहे. आयपीओकरिताची आवश्यक कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सादर केली आहेत.
2023 च्या प्रारंभी कंपनी आपला आयपीओ बाजारात सादर करणार आहे. शेअरबाजारातील परिस्थितीचा आढावा घेऊन सोबत पर्यटन व्यवसायही बहरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओयोने आयपीओची योजना बनवली आहे. हॉटेल बुकिंगशी संबंधित कंपनीने आपली कागदपत्रे काही दिवसांपूर्वी सेबीकडे सुपूर्द केली आहेत.
2021 मध्ये आणायचा होता आयपीओ
खरंतर ओयोने 2021 मध्ये आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे सेबीकडे जमा केली होती. पण कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून कंपनीने या योजनेला गती देणे त्यावेळी टाळले होते. पण सध्याला अर्थव्यवस्था व पर्यटन व्यवसायही पूर्वपदावर परतल्याने कंपनीने आयपीओवर पुन्हा जोर दिला आहे. 2023 च्या जानेवारीत कंपनी आपला
आयपीओ सादर करेल, अशी शक्मयता आहे.