कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उल्लू, देसीफ्लिक्ससह 25 ओटीटी बंद

06:22 AM Jul 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अश्लीलतेच्या प्रदर्शनामुळे केंद्र सरकारचा बडगा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

बीभत्स आणि अश्लील चित्रणे प्रदर्शित करणारे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईटस्च्या विरोधात केंद्र सरकारने धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या अंतर्गत उल्लू, देसीफ्लिक्स, एएलटीटीसह 25 प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेबसाईटस् आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स भारतात कोठेही दाखविल्या जाऊ नयेत, असा आदेश सर्व इंटरनेट सेवा पुरवठादारांना देण्यात आला असून या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.

हे प्लॅटफॉर्म्स आणि अशा वेबसाईटस्कडून सातत्याने कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. त्यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह जाहिराती आणि बीभत्स चित्रणे प्रदर्शित केली जात आहेत. यामुळे समाजमानसावर, विशेषत: लहान मुले आणि पौंगडावस्थेतील युवक-युवती यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून देण्यात आली. या आदेशाची अधिसूचना लागू करण्यात आली आहे

सेवापुरवठादारांवर उत्तरदायित्व

या वेबसाईटस् आणि हे प्लॅटफॉर्म्स त्वरित हटविण्याचे उत्तरदायित्व भारतात इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या सर्व पुरवठादार कंपन्यांवर असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि भारतीय न्याय संहिता यांच्यातील विविध तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. जे सेवा पुरवठादार केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करतील, त्यांचे अनुमतीपत्र आणि मान्यता प्रमाणपत्र रद्द केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कायद्यातील तरतुदी कठोर

माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहिता यांच्यातील या संबंधातील तरतुदी अत्यंत कठोर आहेत. त्यांच्या अनुसार अश्लील आणि बीभत्स चित्रणे किंवा जाहिराती प्रदर्शित करण्यावर, स्टोअर करण्यावर, प्रसारित करण्यावर आणि निर्माण करण्यावर बंदी आहे. या कठोर तरतुदींचे यापुढे पालन करणे अनिवार्य राहणार असून्। आदेशाचा भंग केल्यास गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे.

बेकायदेशीर जुगार अॅप्सवरही बंदी

केंद्र सरकारने गेल्या बुधवारी संसदेत अशी बंदी आणण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती संसदेत दिली होती. बेकायदेशीर जुगार अॅप्सचाही बंदी घालण्यात आलेल्या इंटरनेट साधनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा 1 हजार 524 वेबसाईटस् आणि अनेक अॅप्स यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.  हे बंदीसत्र 2022 पासूनच हाती घेण्यात आले असून केंद्र सरकार अत्यंत निर्दयपणे कारवाई करीत आहे. अशा जुगार अॅप्समुळे लक्षावधी नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली असून केंद्र सरकारने नागरिकांनाही अशा अॅप्स आणि ऑनलाईन योजनांच्या मोहात न पडण्याची सूचना केली आहे.

कोणत्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी...

एएलटीटी, उल्लू, देसीफ्लिक्स, बिग शॉटस् अॅप, बूमॅक्स, नवसारा लाईफ, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, वाव एंटरटेनमेंट, लुक एंटरटेनमेंट, हिटप्राईम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अ•ा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स आणि ट्रायफ्लिक्स अशी या 25 बंदी घालण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म्सची नावे आहेत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article