कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबादमध्ये 39 वर्षांपासून ओवैसींचा वरचष्मा

05:13 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात एआयएमआयएमचे केवळ 9 उमेदवार

Advertisement

संसदेत अणि बाहेर भाजपवर सर्वाधिक कठोर टीका करणारे खासदार असदुद्दीन ओवैसी हे तेलंगणात स्वत:च्या पक्षासाठी निवडणूक प्रचार करत आहेत, परंतु यावेळी त्यांनी काँग्रेसला सर्वाधिक लक्ष्य केले आहे. पूर्ण देशात निवडणूक लढविणारा ओवैसी यांचा पक्ष स्वत:चे गृहराज्य तेलंगणातील 199 जागांपैकी केवळ 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. यातील 7 जागा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमधील आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर 39 वर्षांपासून ओवैसी कुटुंबाचा कब्जा आहे.

Advertisement

बीआरएसला लाभ

2018 च्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांचा पक्ष केवळ 8 जागा लढला आणि  यातील 7 जागांवर यशस्वी ठरला होता. आतापर्यंत त्यांच्या या निर्णयाचा लाभ बीआरएसला होत आला आहे. ओवैसी यांची बीआरएससोबत आघाडी नसली तरीही ते स्वत: लढवत असलेल्या मतदारसंघांच्या व्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी बीआरएसला विजयी करण्याचे आवाहन लोकांना करत आहेत. तर बीआरएस देखील ओवैसी यांना लाभ होईल अशा प्रकारेच स्वत:चे उमेदवार उभे करत असल्याचे मानले जातेय. ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएमने मागील विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात 95, बिहारमध्ये 20 तर गुजरातमध्ये 13 उमेदवार उभे केले होते.

अन्य मुस्लीम नेत्याला संधी नाही

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात 39 वर्षांपासून ओवैसी कुटुंबाचा कब्जा अहे. महापालिका देखील त्यांच्याच पक्षाकडे आहे. तरीही ओल्ड सिटीत समस्यांचा महापूर असल्याची तक्रार आहे. ओवैसी हे हैदराबादमध्ये दुसरा मुस्लीम नेता निर्माण होऊ देत नसल्याची तक्रार स्थानिक राजकीय विश्लेषक करत असतात. एआयएमआयएमने यावेळी ज्युबली हिल्स मतदारसंघात मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. यामागे काँग्रेसने मोहम्मद अझहरुद्दीन यांना उमेदवारी दिल्याचे कारण आहे. एआयएमआयएमने 2018 च्या निवडणुकीत येथे उमेदवार उभा केला नव्हता. तर 2014 मध्ये एका हिंदू धर्मीयाला उमेदवारी दिली होती.

नेहमी सत्तेच्या समीप

एआयएमआयएम नेहमीच सत्तेच्या जवळ राहतो असा आरोप काही जण करतात. अविभाजित आंध्रप्रदेश असताना एआयएमआयएमची मैत्री तेदेप आणि काँग्रेससोबत होती. आता एआयएमआयएम बीआरएसचा समर्थक आहे. ओवैसी यांनी देशभरात निवडणूक लढविली तरीही ते स्वत:च्या बालेकिल्ल्यात सर्वात सेफ गेम खेळत असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article