कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओवैसींचे हैदराबादमध्ये अनोख्या शैलीत स्वागत

07:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हीरोच्या शैलीतील पोस्टर झळकले

Advertisement

हैदराबाद : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अलिकडेच सौदी अरेबिया आणि कुवैत यासारख्या अरब देशांमध्ये पाकिस्तानवर कठोर प्रहार केला आहे. स्वत:च्या शैलीवरून ओवैसी यांनी मोठी प्रशंसाही मिळविली आहे. आता औवेसींचा सहभाग असलेले शिष्टमंडळ भारतात परतले आहे. तर ओवैसी यांचे हैदराबाद येथे जोरदार स्वागत झाले आहे. असदुद्दीन ओवैसी हे दहशतवाद प्रकरणी पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या भारतीय शिष्टमंडळात सामील होते. त्यांच्या शिष्टमंडळाने अल्जीरिया, सौदी अरेबिया, कुवैत आणि बहारीनमध्ये जात ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्याशी निगडित माहिती दिली आहे.

Advertisement

ओवैसी यांच्या स्वागतासाठी हैदराबादमध्sय अनेक पोस्टर्स लावण्यात आली आहेत. एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख आणि हैदराबादचे खासदार ओवैसी याच्या स्वागतासाठी शहरात पोस्टर्स झळकविली आहेत. या पोस्टर्समध्ये ओवैसीच्या कौतुकाचे संदेश आहेत. ‘दहशतवाद विरोधात उभा ठाकला एक इसम, पाकिस्तान विरोधात उभे एक सत्य, गर्वासोबत.. भारताच्या शत्रूची केली पोलखोल’ असे या पोस्टर्सवर नमूद आहे.  ओवैसी यांनी सौदरी अरेबियात बोलताना पाकिस्तान अन् दहशतवादामधील साटलोट्याची पोलखोल करत पाकिस्तानला एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली होती. पाकिस्तानपेक्षा अधिक मुस्लीम भारतात असल्याचेही त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पाकिस्तानची विचारसरणी इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांशी मिळतीजुळती असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article