आता इंटरनेटशिवाय संदेश पाठविता येणार
नवीन मॅसेजिंग अॅप‘बिटचॅट’सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक नवीन मेसेजिंग अॅप ‘बिटचॅट’ लाँच केले आहे. हे अॅप इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील काम करते. म्हणजेच, वापरकर्ते या अॅपद्वारे इंटरनेटशिवाय एकमेकांना संदेश पाठवू शकतील.
हे गोपनीयता केंद्रित मेसेजिंग अॅप पीअर-टू-पीअर तंत्रावर आधारित आहे आणि त्याला कोणत्याही केंद्रीकृत सर्व्हर किंवा फोन नेटवर्कची आवश्यकता नाही. सध्या, हे अॅप फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी टेस्ट फ्लाइट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
बिटचॅट ब्लूटूथ नेटवर्कवर काम करते
बिटचॅट ब्लूटूथ लो एनर्जी मेश नेटवर्कवर काम करते. ज्यामध्ये स्मार्टफोन एकमेकांमध्ये लहान क्लस्टर तयार करतात आणि एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर एक्रिप्टेड संदेश पाठवतात. ब्लूटूथद्वारे काम करत असल्याने त्याला वाय-फाय किंवा मोबाइल डेटाची आवश्यकता नाही. हे अॅप विशेषत: अशा ठिकाणी उपयुक्त आहे जिथे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नाही किंवा जिथे नेटवर्क बंद आहे.
व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम सारख्या पारंपारिक मेसेजिंग अॅप्सच्या, बिटचॅट पूर्णपणे विकेंद्रित आहे. यासाठी वापरकर्त्यांना ईमेल किंवा फोन नंबरसह खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. संदेश फक्त वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर संग्रहित केला जातो आणि काही काळानंतर तो हटविला जातो.
