कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिपॅटायटीसवर करा मात, ‘अरिहंत’ची घ्या साथ

12:15 PM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज जागतिक हिपॅटायटीस दिन : अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. वरदराज गोकाक, डॉ. गणेश कोप्पद यांच्याकडून योग्य उपचार

Advertisement

बेळगाव : जागतिक हिपॅटायटीस दिन 28 जुलै रोजी साजरा केला जातो. यंदा डब्ल्यूएचओने यावर्षी हिपॅटायटीस : ‘चला ते खंडित करूया’ अशी थिम ठेवली आहे. याचा उद्देश सांक्रमिक हिपॅटायटीस आणि यामुळे होणाऱ्या यकृताच्या गंभीर समस्या व कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविणे आहे. हिपॅटायटीस हा गंभीर आजार असला तरी आपण दैनंदिन जीवनात बदल व सटिक उपचार घेतले तर यावरही मात करता येते. बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलमधील डॉ. वरदराज गोकाक यांच्या नेतृत्त्वाखाली व डॉ. गणेश कोप्पद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग हिपॅटायटीस रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत आहेत. तसेच अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.

Advertisement

हिपॅटायटीस आजार हा अनेक कारणांनी होऊ शकतो. मात्र, अरिहंत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे ग्रॅस्ट्रो विभाग कार्यरत असून येथे आजारावर योग्य व यशस्वी उपचार करण्यात येतात. डॉ. वरदराज गोकाक हे वरिष्ठ व अनुभवी गॅस्ट्रोएंट्रोलॉजीस्ट म्हणून सेवा बजावत असून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करून नवजीवन दिले आहे. गॅस्ट्रोचा कोणता आजार असला तरी रुग्ण डॉ. वरदराज गोकाक यांनाच पसंदी देऊन त्यांच्याकडून उपचार करून घेतात. त्यांना डॉ. गणेश कोप्पद यांचीही मोलाची साथ मिळत असून तेही रुग्णांवर योग्य उपचार देण्यात सक्षम आहेत.

जागतिक हिपॅटायटीस दिन दरवषी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश व्हायरल हिपॅटायटीस, यकृताची जळजळ आणि त्यामुळे होणारे गंभीर यकृत रोग आणि यकृताचा कर्करोग याबद्दल जागरुकता वाढवणे आहे. हा दिवस, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बाऊच ब्लमबर्ग यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. त्यांनी हिपॅटायटीस बीचा शोध लावून त्याच्या निदानासाठी चाचणी आणि लस विकसित केली.

व्हायरल हिपॅटायटीस हा यकृताच्या ऊतींच्या विषाणूंमुळे होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि ई हे पाच मुख्य विषाणू आहेत. रोगाची तीव्रता आणि उपचार हिपॅटायटीसच्या प्रकारावर आणि व्यक्तीवर अवलंबून असतात. यामुळे कधी कधी सिरोसिस किंवा कर्करोगाचा धोका संभवतो. हिपॅटायटीस पिवळ्या त्वचेने (कावीळ), गडद लघवी, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीच्या माध्यमातून दिसून येतो.

हिपॅटायटीस ए : सामान्यत: शरीर हिपॅटायटीस ए विषाणूंविऊद्ध लढण्यास सक्षम असते. म्हणून या आजारासाठी विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते. परंतु विश्र्रांती आणि चांगला समतोल आहार घेतल्यास तो आजार बरा होतो. 4 ते 6 आठवड्यांनंतर लक्षणे नाहीशी होतात.

हिपॅटायटीस बी : बहुतेक प्रकरणांमध्ये हिपॅटायटीस बी विषाणूचा संसर्ग आपोआप बरा होतो. कोणत्याही औषधोपचाराची आवश्यकता नसते. विश्र्रांती व पोषक आहार घेण्याची आवश्यकता असते. जेव्हा संसर्ग 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकतो, तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. हिपॅटायटीस बी संसर्गावर विविध उपचारपद्धती असून औषधेही उपलब्ध आहेत. यामुळे औषधोपचारातून संसर्गावर मात करता येते.

हिपॅटायटीस सी : सामान्यत: अँटिव्हायरल औषधांनी उपचार केले जातात, ज्यामुळे संसर्ग बरा होतो. गंभीर परिस्थितीमध्ये निरीक्षण करण्यात येते. तर जुनाट प्रकरणांमध्ये स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार, यकृत कार्य चाचण्या आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते.

हिपॅटायटीस डी व ई : उपचारांमध्ये लक्षणांवर आधारित काळजी घेऊन अँटिव्हायरल औषधे यांचा समावेश असतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनात बदल करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असते. पोषक आहाराचे सेवन करावे. तसेच व्यसनापासून दूर राहण्याची गरज असते.

लक्षणे ...

उपचार ...

हिपेटायटीसची लागण झाल्यानंतर योग्य उपचार आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच आपल्या जीवनशैलीत बदल करून हिपॅटायटीसवर मात करणे शक्य आहे. यासाठी आपण त्यादृष्टीने बदल करण्याची आवश्यकता असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन जीवन जगणे अत्यावश्यक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article