For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाइलच्या ओव्हर चार्जिंगने घेतला 4 चिमुकल्यांचा जीव

06:21 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाइलच्या ओव्हर चार्जिंगने घेतला 4 चिमुकल्यांचा जीव
Advertisement

मेरठमधील दुर्घटना : चार्ज करत असताना शॉर्टसर्किटमुळे घराला आग

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

मोबाइलचे चार्जिंग करताना झालेल्या दुर्लक्षामुळे यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आता मोबाइलचे ओव्हर चार्जिंग किंवा चार्जिंग करताना मोबाइलचा वापर केल्याने काय घडू शकते याचे विदारक उदाहरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठच्या पल्लवपुरम भागातील एका घराला मोबाईल चार्ज करत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने चार मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांचे पालकही गंभीरपणे होरपळले आहेत.

Advertisement

चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. आपली मुले मोबाईलवर गेम खेळत असताना चार्जिंगही सुरू होते. याचदरम्यान मोठा आवाज झाला अन् शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे जॉनी यांनी सांगितले. स्फोटावेळी मोबाईल अंथरुणावर असल्यामुळे काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पल्लवपुरम पोलीस स्थानक हद्दीतील जनता कॉलनीतील जोनी नावाच्या व्यक्तीच्या घरात शनिवारी रात्री मोबाईल फोन चार्ज होत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे पोलीस सूत्रांनी रविवारी सांगितले. आगीने काही वेळातच एवढे गंभीर रूप धारण केल्यामुळे जॉनी, त्याची पत्नी बबिता आणि चार मुले सारिका (10), निहारिका (8), संस्कार उर्फ गोलू (6) आणि कालू (4) गंभीरपणे भाजले. या सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले जेथे रात्री उशिरा निहारिका आणि गोलूचा मृत्यू झाला तर रविवारी सकाळी सारिका आणि कालू यांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जॉनीची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु बबिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्ली एम्समध्ये रेफर करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.