महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या पाच हजारांवर तक्रारी

11:27 AM Dec 20, 2024 IST | Radhika Patil
Over 5,000 complaints of online fraud in the district
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

जिह्यात पोलिसांत दाखल आणि अज्ञात अशी कोट्यावधींची फसवणूक होत असल्याचा अंदाज आहे. कोल्हापूर सायबर पोलिसांकडे ऑनलाईन फ्रॉडच्या पाच हजार 102 तक्रारींपैकी 4 हजार 276 प्रकरणांतील 5 कोटी 35 लाख 1 हजार 396 रुपये गोठवण्यात किंवा परत मिळवण्यात यश आले. देशभरात वर्षाला सुमारे 12 हजार कोटींची ऑनलाईन फसवणूक होते. सायबर क्राईमच्या अशा पसवणुकीच्या घटनांत दरवर्षी 15 टक्के वाढ होत असून याबाबत वेळीच तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत आहे. यात दरवर्षी सरासरी 15 टक्के वाढ होत असल्याचा निष्कर्ष आहे. सायबर गुन्हेगार रोज नवीन क्लुप्त्या काढत फसवणुकीचे फंडे वापरतात. कोल्हापुरातही अशा फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत आहे. बँकांसह आधारकार्डसह लायसन्स तसेच इतर कंपन्यांची कागदपत्रे तसेच माहिती डाऊनलोड करण्यासाठी संशयित चॅटबॉटचा वापर करत आहेत. बँकांसह अनेक कंपन्या चॅट-बॉटचा संवादासाठी वापर करतात. उदाहणार्थ बँका अधिकृत चॅट-बॉटवरुन ग्राहकांशी संवाद साधताना मेसेज पाठवून आपणास कोणती सेवा पाहिजे, याची खात्री करतात. एक, दोन, तीन असे पर्याय देतात. याव्दारे बॅलेन्ससह सेवा तसेच माहिती मिळते. मात्र फेक चॅट-बॉटचा वापर करुन संशयित फसवणूक करत आहेत. विमातनळावरील पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे चॅटबॉटव्दारे दर्शवून फसवणुकीचे प्रकार कोल्हापुरातही वाढले आहेत.

संशयास्पद कॉल तसेच मेसेजला प्रतिसाद देऊ नका. चॅटबॉटच्या आधारे हॅकर क्रीन शेअर करण्यास पटवून देतात. यासाठी एक अॅप किंवा सॉफ्टवेअर गुप्तपणे आपल्या मोबाईलमध्ये स्थापित केले जाते. संवेदनशील माहिती जसे की बँक तपशील, पासवर्ड आणि बँकिंग सेवांमध्ये याव्दारे प्रवेश केला जातो. त्यामुळे अनोळखी क्रमांकावर क्रिन शेअर करताना काळजी घेतली पाहिजे. मुली किंवा मुलांसोबत व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह बोलणे झाल्यास वापरकर्त्याला धमकावण्यासाठी त्याचा वापर होतो. हॅकर्स वापरकर्त्याला ब्लॅकमेल करतात आणि त्या बदल्यात पैशाची मागणी करतात. मुख्यत: व्हिएतनाम, केनिया, इथिओपिया आणि मलेशियाशी संबंधित देशातील कोड तसेच सर्व्हरचा वापर संशयित करत असल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड होते. त्यामुळे सावधानता हाच यावर बचावाचा राजमार्ग असल्याचे तज्ञ सांगतात.

                                                सायबर पोलिसांची कामे

जिह्यातील सायबर गुन्हे तपास आणि मदत, सीपीबीएस सॉफ्टवेअरव्दारे संशयिताचे रेखाचित्र काढणे, सोशल मीडिया मॉनिटरींग करत असतो. सोशल मीडिया मॉनिटरींग सेलव्दारे सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवून कारवाई करणे, धार्मिक किंवा विशिष्ट जाती धर्म-पंथ वंश यांच्याबाबत अक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या इसमांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे, आदी कामे पोलिसांचा सायबर विभाग करतो.

                                       कोल्हापूर सायबर विभागाची कामगिरी

वर्षभरात 250 गहाळ मोबाईल शोधून मुळ मालकांना परत दिले. आर्थिक फसवणुकीसह सोशल मिडीया मिळून प्राप्त तक्रारी 5102 असून त्यापैकी ऑनलाईन फ्रॉडच्या 4276 प्रकरणांमध्ये 5 कोटी 33 लाख 51 हजार 396 रुपये इतकी रक्कम तात्काळ गोठवली तसेच परत मिळवून दिली. आत्महत्येचा स्टेटस ठेवून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून जीव वाचवला. यासह जिह्यात दाखल असलेले खूनाचे 48 गुन्हे, बलात्कार व पोक्सोचे 223 गुन्हे, मनुष्य पळवून नेण्याचे 249 गुन्हे, दरोड्याचे 11 गुन्हे, जबरी चोरीचे 88 गुन्हे, घरफोडी चोरी व सर्व चोऱ्यांचे 586 गुन्हे सीडीआर, लोकेशन, टॉवर डंप यांचे तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने उघडकीस आणले. एका व्यावसायिकाला सायबर फ्रॉडव्दारे फसवलेल्या 98 लाखांपैकी 87 लाख रुपये तांत्रिक तपासातून परत मिळवून दिले.

                                             तक्रारीसाठी पुढे या

ऑनलाईन किंवा सायबर फसवणूक होऊ नये यासाठी सजग राहणे, आक्षेपार्ह फोन कॉल्स मेसेजला रिप्लाय देऊ नका. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांना संपर्क करा. पोलीस आपले मित्र आहेत, फसवणूक झाल्यास न्युनगंड न बाळगता, इतरांची फसवणूक होऊ नये, यासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढे या.

                                       रविंद्र कळमकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर)

                 काय करावे आणि काय करू नये ? 

अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका.

अनोळखी व्हॉट्सअॅप कॉल्स किंवा संपर्क साधणारे नंबर ब्लॉक करा.

फसवणूक झाल्याचे कळताच सायबर सेल तसेच व्हॉटसअॅपला कळवा.

व्हॉटस्अॅप वापरकर्त्यांनी शक्यतो टू स्टे व्हेरीफिकेशनचा वापर करावा.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article