For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मशीद तोडून मंदिर उभारणीस आमचा विरोध : उदयनिधी

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मशीद तोडून मंदिर उभारणीस आमचा विरोध   उदयनिधी
Advertisement

चेन्नई : सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्ये करणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अयोध्येतील राम मंदिरासंबंधी टिप्पणी केली आहे. द्रमुक कुठलीही श्रद्धा किंवा धर्माचा विरोधक नाही. आम्ही मशीद तोडून मंदिर उभारणी करण्यावर सहमत नाही असे स्टॅलिन यांनी गुरुवारी म्हटले आहे. मंदिर उभारणी ही काही समस्या नाही, परंतु आम्ही मशीद तोडून तेथे मंदिर उभारणी करण्यासाठी सहमत नाही. अध्यात्मवाद आणि राजकारणाला परस्परांमध्ये मिसळले जाऊ नये असे उदयनिधी म्हणाले. उदयनिधी यांनी यापूर्वी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्यं केली होती. सनातन धर्माची तुलना त्यांनी डेंग्यू तसेच मलेरियासोबत केली होती. सनातन धर्माला केवळ विरोध केला जाऊ नये तर तो पूर्णपणे समाप्तच केला जावा. काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना संपविलेच जावे. आम्ही डेंग्यू, मलेशिया, डास किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही, आम्हाला या गोष्टी संपवाव्या लागणार आहेत. अशाचप्रकारे आम्हाला सनातन धर्म संपवावा लागणार असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले होते. उदयनिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दिगवंत नेते एम. करुणानिधी यांचे नातू आहेत. उदयनिधी हे वडिल एम.के. स्टॅलिन यांच्याच मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.