महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीन अन् भारतासोबत आमची मैत्री : दिसानायके

06:22 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही देशांदरम्यान ‘सँडविच’ होणार नाही : श्रीलंकेचे विदेश धोरण निष्पक्ष असणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

भारत आणि चीनदरम्यान सँडविच होण्याची आमची इच्छा नाही. श्रीलंका जगाच्या कुठल्याही राजनयिक युद्धात सापडू इच्छित नसल्याचे उद्गार नवे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. आम्ही कुठल्याही स्पर्धेत हिस्सा घेणार नाही तसेच दबदबा निर्माण करण्यासाठी लढत असलेल्या कुठल्याही देशाला साथ देणार नाही. दोन्ही देश आमचे चांगले मित्र आहेत. भविष्यात आमची भागीदारी चांगली ठरेल अशी अपेक्षा असल्याचे दिसानायके यांनी म्हटले आहे.

युरोपीय महासंघ, मध्यपूर्व आणि आफ्रिकेसोबत आम्ही चांगले संबंध राखणार आहोत. श्रीलंकेचे विदेश धोरण निष्पक्ष असेल असे दिसानायके यांनी म्हटले आहे.दिसानायके यांनी सोमवारीच राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. श्रीलंकेत 2022 मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी मुख्य स्पर्धक उमेदवार सजिथ प्रेमदासा यांना 10 लाख मतांनी पराभूत केले आहे. तर श्रीलंकेची माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

श्रीलंका हा दिवाळखोर ठरलेला देश आहे. आमच्यावर 28 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. देशातील आर्थिक संकट दूर करणे ही माझी प्राथमिकता असल्याचे दिसानायके यांनी नमूद पेले. श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतींना भारत आणि चीनसोबत पाकिस्तान तसेच मालदीवकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.

अनुरा हे उत्तर मध्य प्रांताच्या थंबुत्तेगामा येथील असून त्यांनी कोलंबोच्या केलानिया विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळविली होती. 1987 मध्ये ते जेवीपी या राजकीय पक्षात सामील झाले. तेव्हा श्रीलंकेत भारतविरोधी भावना प्रबळ झाली होती. या पक्षाने दोन रक्तपात घडवून आणणाऱ्या दोन बंडांचे नेतृत्व केले होते. 2014 मध्ये अनुरा हे या पक्षाचे प्रमुख झाले. तर 2019 मध्ये जेव्हीपीचे नाव एनपीपी करण्यात आले. अनुरा हे चालू वर्षात भारत सरकारच्या निमंत्रणानुसार नवी दिल्ली येथे आले होते. तेव्हा त्यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांची भेट घेतली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article