महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात ठार

06:41 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी गाजीची अज्ञातांकडून हत्या : पेशावरमध्ये घडला प्रकार

Advertisement

वृत्तसंस्था/ पेशावर

Advertisement

पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांतात अकरम खान उर्फ गाझीची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. गाझीच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती. गाझी हा काश्मीरमधील युवकांना भडकवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करायचा. तसेच दहशतवादी हल्ल्यांसाठी त्यांची घुसखोरी घडवून आणण्यात त्याची मोठी भूमिका होती. 2018-20 पर्यंत लष्कर-ए-तोयबामध्ये दहशतवाद्यांची भरती करणाऱ्या शाखेचा तो प्रमुख होता.

अकरम खान उर्फ अकरम गाझी याची खैबर पख्तूनख्वा येथील बजौरमध्ये हत्या करण्यात आली आहे. अकरमची हत्या ही आयएसआयसोबत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसाठी देखील मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. गाझी हा लष्कर-ए-तोयबासाठी भारताच्या विरोधातील सर्वात महत्त्वपूर्ण दहशतवादी होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यातील युवकांना अत्यंत प्रभावीपणे भडकविण्याचे काम तो करत होता. भारताच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी तो कुख्यात होता. मागील दोन वर्षांमध्ये काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या मोठ्या संख्येतील दहशतवाद्यांना त्याच्याकडूनच प्रशिक्षण मिळाले होते असे सांगण्यात येते.

यापूर्वी रविवारी ख्वाजा शाहिद या दहशतवाद्याची हत्या झाली होती. ख्वाजा शाहिद हा 2018 मध्ये भारतीय सैन्याच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता. शाहिदचा शीर धडावेगळा केलेला मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमध्ये आढळून आला होता. गाझी आणि शाहिदपूर्वी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोट येथे लष्कर-ए-तोयबाचा कमांडर रियाज अहमदची हत्या झाली होती. तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम सांभाळत होता. कासिमने काश्मीर खोऱ्यातील राजौरी तसेच पुंछ भागातील युवकांची दिशाभूल करत स्वत:ची एक लाँचिंग कमांडर म्हणून ओळख निर्माण केली होती.

एका मागोमाग एक झटके

गाझीची हत्या यंदा लष्कर-ए-तोयबाच्या कुठल्याही आघाडीच्या ऑपरेटिव्हची तिसरी हत्या आहे. तर सीमापार सक्रीय कुठल्याही टॉप कमांडरची सहावी हत्या आहे. मार्च महिन्यात हिजबुल मुजाहिदीनच्या एका टॉप कमांडरची पाकिस्तानच्या रावळपिंडीत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी कराची या शहरात अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सैयद खालिद रजाची हत्या केली होती. स्थानिक पोलिसांनी याला टार्गेट किलिंग ठरविले होते. तर चालू वर्षाच्या प्रारंभी इस्लामिक स्टेटचा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी ऐजाज अहमद अहंगरची अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात हत्या झाली होती. तर खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत पंजवारची मे महिन्यात अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. लष्कर-ए-तोयबाचा मुफ्ती कैसर फारुकला एका मदरशात ठार करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article